वांगी बुद्रुक मध्ये ऊस पेटवला तीन जना विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

वांगी बुद्रुक मध्ये ऊस पेटवला तीन जना विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
टाकळीभान:वांगी बुद्रुक शिवारातील ऊस पेटवून दिला म्हणून, शेतकरी कारभारी ठोंबरे यांनी पोलिसात ऊस पेटवून देणाऱ्या तीन जनाच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला,
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वांगी शिवारात शेती गट नं 35 मध्ये 4 एकर शेती आहे. सदरची शेती ही साठेखात करून विलास भाऊसाहेब होन याच्याकडुन घेतलेली आहे. त्यापैकी अडीच एकर क्षेत्रामध्ये 265 जातीच्या उसाचे पिक एक वर्षापूर्वी लावलेले आहे. दि. 14/10/2023 रोजी रात्री 11.00 वा चे सुमारास माझा मुलगा अनिल बाजीराव ठोंबरे हा ट्रॅक्टर घेवुन शेत नांगरण्यासाठी पुढे गेला ,व मी त्याच्या पाठीमागुन मोटारसायकलवर गेलो ,तेव्हा माझ्या मुलाने टेक्टर वळविले असता मला ट्रॅक्टरच्या उजेडात दोन ते तीन इसम आमच्या उसाच्या कोपऱ्यावर दिसले ,तेव्हा मी व माझ्या मुलाने त्यांना आवाज दिला असता, ते तेथून पळुन गेले, तरीपण मी टॅक्टरच्या लाईटच्या उजेडात त्यांना जाताना पहिले असता , पांडुरंग केशव बिडगर , अमोल केशव बिडगर, केशव आप्पासाहेब बिडगर हे तेथून पळताना दिसले. यावेळी माझ्या मुलाने आरडाओरडा केला असता, आमच्या शेजारी राहणारे लोक जमा झाले, व त्यांनी माझा उस विझवण्यास मदत केली तरीपण अडीच एकर क्षेत्रापैकी माझा वीस गुंठे उस जळाला आहे. तरी दि 14/10/2023 रोजी रात्री 11.00 वा चे सुमारास माझे वांगी बु. शिवारात शेती गट न 35 मध्ये असलेल्या अडीच एकर उसापैकी वीस गुंठे उस हा , पांडुरंग केशव बिडगर, अमोल केशव बिडगर , केशव आप्पासाहेब बिहार सर्व रा वांगी बु. बाराचारी ता.श्रीरामपूर यांनी पेटवून दिला म्हणुन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये या तीन जणांच्या विरोधात भा्दवि कलम 435 गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखा हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहे ,