आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

*सत्य मौन असत याचा अर्थ ते कमजोर मुळीच नसतं योग्य वेळी ते असत्याला मुळासकट उखडून टाकत*

*सत्य मौन असत याचा अर्थ ते कमजोर मुळीच नसतं योग्य वेळी ते असत्याला मुळासकट उखडून टाकत*

 

सत्य हे ज्ञानावर उभा असत म्हणून ते मौन धारण करून असतं याचा अर्थ असा होत नाही कि सत्य हे कमजोर आहे दुबळ आहे .उलट सत्याच मौन हे असत्याला योग्य वेळी मुळासकट उखडून टाकत एवढी प्रचंड ताकद शक्ती क्षमता सत्याच्या मौनात असते . सत्य हे धर्म, संस्कार,ज्ञान, संस्कृती, असल्याने ते सदैव स्थिर शांत , सोज्वळ, संयमी निस्वार्थी, दिशादर्शक असत .याउलट असत्य हे उतावीळ, अस्थिर,घाबरट, बेचैन,लाचली,दिशाहिन, स्वार्थी आणि असंयमी असत. सत्य हे ज्ञानावर स्थिर असल्याने मौन असतं स्थिर असतं पण असत्य सतत अज्ञानावर स्थिर असल्याने ते नियमित अस्थिर असुन दिशाहिन असल्याने आपणच सत्य आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपडत असत पण असं होतं नाही .असत्याचा कितीही प्रचंड भायनक मोठा आवाज असला तरी तो फार फार सत्याला थोड्या वेळासाठी शांत मौन करू शकतो .या पेक्षा जास्त क्षमता त्या मध्ये नसतेच मुळी पण सत्याच मौन असत्याला योग्य वेळी मुळासकट उखडून टाकणयाची ताकद ठेवून असतं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला योग्य वेळी येतो .म्हणून असत्याचा मोठा आवाज हा काही कालावधी साठी सत्याला मौन करू शकेलही हे जरी अगदी खरं असल तरी हा कालावधी फार विशाल किंवा मोठा नसतो‌. पण याच दरम्यान सत्याने राखलेल मौन योग्य वेळ आल्यानंतर असत्याला मुळासकट उखडून टाकत हा निसर्गाचा नियम सिद्धांत आहे . म्हणून सत्यच मौन स्वीकारणं याचा अर्थ ते कमजोर आहे असा मुळीच होत नाही .उथळ पाण्याला खळखळाट फार असतो आणि खोल पाणी स्थिर संयमी पाण्याचा प्रवाह शांत असतो .या उलट उथळ पाणी प्रचंड खळखळाट करत पण ते पाणी हे अंतिमतः उथळच असत.हेच गणित समान पद्धतीने मानवी स्वभावाला लागु पडत . सत्य आणि असत्य या मानवी स्वभावाच्या दोन परस्परविरोधी बाजु आहेत .आपण जी बाजु स्वीकारली त्या बाजुच आपण समर्थन करतो . आणि तीच बाजु कशी मजबूत आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असतो .मग ती बाजु सत्याची कि असत्याची आहे याची जाणीव फार कोणीही गंभीरपणे घेत नाही.पण योग्य वेळी योग्य परिणाम आल्यावर मात्र आपलं स्वीकारत कि आपण कोणाची बाजु घेतली.पण ते खुल्या मनाने बोलण्याच कोणी धरिष्ठय करत नाही. योगायोगाने जर आपण असत्याची बाजु स्वीकारली तर आपण किती ही प्रयत्न केले तर फार काही उपयोग होत नाही.हे अनुभव सत्य असतं पण हे मान्य करण्यासाठी सुद्धा खूप मोठ् धारीष्ठय लागत .कारण सत्याची बाजू हि दुबळी वाटत असली तरी ती दुबळी नसते कारण सत्याच्या बाजूने निसर्ग असतो . न्याय असतो निति असते . निसर्गातील सर्व सकारात्मक शक्ति ह्या सत्याच्या बाजूने कार्यरत असतात म्हणून सत्य हे मौन भासल वाटलं याचा अर्थ ते पराभूत झाल असा होत नाही. उलट जेव्हा निसर्ग आणि धर्म आपला प्रभाव दाखवतात तेव्हा मौन असलेलं सत्य असत्याला मुळासकट उखडून टाकत हा इतिहास आहे. नैसर्गिक सिद्धांत आहे. म्हणून आपल्या जीवनातील ज्ञाना ठरवतं आपण कोणाच्या बाजुने उभा राहयच ते . सद मार्गावर आपण मार्गक्रमण करत असु तर आपण नक्कीच सत्याची बाजूने असु आणि आपण अज्ञानावर असु तर आपण कळत न कळत असत्याचा बाजुने जावु शकतो . म्हणून सदैव ज्ञानावर असणं म्हणजे सत्याची बाजू ने भक्कम उभा असण आणि अंतिमतः शाश्वत विजयला गवसणी घालण म्हणून सत्य हे मौन भासल वाटलं म्हणून त्याला कमजोर न समजता त्याच्या बाजुने आपल्याला उभा राहता येण हेच जीवनातील महत्वाचे व्यवहारिक ज्ञान आहे.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे