कै. प्रसादभाऊ कदम हेल्थ क्लबच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची साफ सफाई

टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथे कै. प्रसादभाऊ कदम हेल्थ क्लबच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची साफ सफाई मोहीम.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे परिसर साफ सफाई करण्याचे नियोजन होते. परंतु कालच शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार असल्याने ही मोहीम आज हाती घेण्यात आली,
अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य मैदानावर पसरले होते. शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते या भावनेने संपूर्ण शाळेच्या परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे क्लबच्या सदस्यांच्या वतीने ठरविण्यात आले आणि बघता बघता संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला.
यावेळी साचलेला कचरा एकठीकानी गोळा करून त्याची “होळी” करत, कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असा संदेश क्लबच्या सदस्यांच्या वतीने देण्यात आला.
या हेल्थ क्लबचे वैशिष्ट्य म्हणजे या क्लबच्या सदस्यांमध्ये सरकारी अधिकारी, राजकीय पुढारी, खेळाडू, व्यावसायिक, शेतकरी, शिक्षक, व्यापारी, विद्यार्थी अशा विविध क्षेत्रातील मंडळींचा समावेश आहे. रोज सकाळी न चुकता ही सर्व मंडळी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामासाठी एकत्र येतात. यामध्ये महावितरणचे अधिकारी गणेश शेळके ,आणि मुंबई पोलीस विनोद रणनवरे, सर्वांना मार्गदर्शन करतात.
या मोहिमेत बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, क्रीडा प्रशिक्षक रवींद्र गाढे सर, समीर शेख, हेमंत पटारे, केतन शिंदे, देविदास नाईक, विशाल गड्डेवाड, गोकुळ बिरसने, चेतन कुमावत यांनी परिश्रम घेतले.