गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते वांगी मध्ये होणार श्री दत्तात्रेय भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा

गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते वांगी मध्ये होणार श्री दत्तात्रेय भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक व वांगी खुर्द वांगी फाटा येथे माने पाटील वस्ती येथे त्यांची धार्मिक वृत्ती व त्यांनी ठेवलेली संकल्पना खऱ्या आयुष्यात उतरवत बुधवार दिनांक 6/4/2022 रोजी परम पूज्य गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थान यांच्या शुभहस्ते श्री दत्तात्रेय भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी नऊ ते दहा या वेळेत श्री दत्तात्रेय भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळा यानंतर सकाळी 10 ते 12 परम पूज्य गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांचे श्रीहरिकीर्तन होणार व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल या कार्यक्रमासाठी राजाराम महाराज पवार, श्रीकृष्ण महाराज मते, भगवान महाराज जंगले शास्त्री, अर्जुन महाराज हाळनोर, मच्छिंद्र महाराज चोरमले शास्त्री, हरी महाराज जगताप, यशोदानंद महाराज माने, संदीप महाराज जाधव, हरी महाराज पिसाळ उपस्थित राहणार आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या आनंदमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे वांगी खुर्द व वांगी बुद्रुक श्री गणेश भजनी मंडळ व श्री दत्त तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे