विकास कामांना विरोध करून फक्त निवडनुकीपुरते येणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा – नंदकुमार डोळस

.विकास कामांना विरोध करून फक्त निवडनुकीपुरते येणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा – नंदकुमार डोळस
राहुरी खुर्द येथील वार्ड क्र. २ मधील होत असलेल्या पोटनिवडणूकीच्या बुवासाहेब महाराज ग्रामविका मंडळाचे उमेदवार अमोल डोळस यांच्या प्रचाराची सांगता सभा नुकतीस मारुती मंदिरा समोर संपन्न झाली त्यावेळेस मंडळाचे प्रमुख नंदकुमार डोळस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला .
राहुरी खुर्दचे ग्रामदैवत मारुती मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग भिसे हे होते . दिलीप क्षिरसागर यांनी प्रस्ताविक करून बुवासाहेब ग्रामविकास मंडळाने केलेल्या विकास कामे सांगितली तर मच्छिंद्र पाटोळे व भरत धोत्रे यांनी समोरील मंडळाच्या प्रमुखांनी जनतेला कशा भूलथापा मारल्या त्याचा पाढाच वाचून दाखवला तर एकनाथ माळी यांनी समोरील मंडळाच्या प्रमुखांनी अदिवासी समाजाची कशी फसवणूक केली व ते थापा मारण्यात पटाईत असल्याचे सांगितले तर राजेंद्र भांड यांनी मंडळाचे उमेदवार अमोल डोळस यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले . अंबादास साखरे यांनी ह्या वार्डांत विकासकामे राबवण्यासाठी अमोल डोळस यांना विजयी करण्याचे आवाहन केले .
मंडळाचे प्रमुख नंदकुमार डोळस यांनी विरोधक विकास कामांना कसा विरोध करतात याचाच पाढाच मतदारांना वाचून दाखवून बुवासाहेब विकास मंडळाने सत्तेत असनाना केलेली विकासकामे व पुढील होणारी विकासकामे करण्यासाठी मंडळाचे उमेदवार अमोल डोळस यांना विजयी करण्याचे आवाहन केले व विरोधकांनी केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला यावेळी मंडळाचे प्रमुख निसारभाई शेख , बाबासाहेब शेडगे , अशोक तोडमल , ज्ञानदेव तोडमल , विठ्ठल मामा राऊत , राजेंद्र खोजे मारुती शेडगे ,नरेंद्र शेटे , अंबादास साखरे रावसाहेब शिंदे , साईनाथ भिसे , बाळू कोरडे संजय डोळस ,राहुल ससाणे ,रामदास ससाणे ,बाळू पेटारे , सोमनाथ गुंड , भाऊराव शेडगे ,भाऊ जाधव ,आदिंसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थीत होते .