शेत रस्त्याच्या प्रश्नावर 19 सप्टेंबरला नेवासा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची बैठक

शेत रस्त्याच्या प्रश्नावर 19 सप्टेंबरला नेवासा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची बैठक
महाराष्ट्र राज्य शिव व शेत पानंद रस्त्याच्या प्रश्नावर पारनेरचे शरद पवळे यांचे विशेष मार्गदर्शन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील व सर्व तालुक्यांमधील शेतकरी शेत रस्ता समस्या सोडविण्यासाठी आपापल्या तालुक्यातील तहसील कार्यालयावर कायमच चकरा व हेलपाटे मारत आहेत.
शेतकरी शेत रस्त्याच्या समस्यांनी पूर्ण भांबावून गेला आहे गोंधळात पडला आहे दिवसेंदिवस शेतीची होत असलेली तुकडेवारी, भावा भावात होणारी शेतीची वाटणी भाऊ हिस्सा व त्यातूनच होणारे बांधावरील भांडणे व भाऊबंदकी व यामुळे शेत रस्ता अडचणी वाढत आहेत यासह तहसील कार्यालयात शेत रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शेतकरी अडून बसलेला आहे प्रसंगी कोर्ट केसेस फौजदारी स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद व इतर भांडण तंटे याबाबतीत प्रमाण वाढत चाललेले आहे.
शेत रस्त्यांच्या समस्या यासह शेतकरी शेतीमध्ये मनुष्यबळ कमी उपलब्ध होत असल्याने पूर्ण मेटाकुटीस आला असून त्यामुळे यांत्रिकी साधनांचा अवलंब करणे भाग पडले आहे. शेतीमध्ये शेतीची मशागत पेरणी पिकामधील आंतरमशागत पीक कापणी पिकवाहतूक इत्यादीसाठी यांत्रिकी साधनांचा वापर करावा लागत आहे. उत्पादित माल बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्यासाठी अडचणी या शेत रस्त्यामुळे निर्माण होत आहे.
त्यामुळे बारमाही व्यवस्थित यांत्रिकी साधने वाहतूक करण्यासाठी सुव्यवस्थित शेत रस्त्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे या शेत रस्त्याच्या समस्या साठी प्रशासनाची जबाबदारी असताना प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दाद देत नाही शेत शिव पानंद रस्त्यांची प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादित माल बाजारपेठेत नेण्यासाठी व शेतात यांत्रिकी शेती अवजारे नेण्यासाठी खूपच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शेत रस्त्याच्या प्रश्नावर उपाय म्हणून शेत व शिवपानंद रस्त्याच्या समस्यां निवारणासाठी अतिक्रमण हटविण्यासाठी शेत व शिवपानंद रस्त्याच्या शासकीय मोफत मोजणी करून हद्दी व खुणा निश्चित करून द्याव्यात. अशा स्वरूपाचे आदेशही काढलेले आहेत परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही दिरंगाई होत आहे.
तहसील कार्यालयासह संबंधित इतर विभागाकडून शेतकऱ्यांची होत असलेली कायमची अवहेलना चकरा मारून हेलपाटे मारून होत असलेला त्रास थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता निर्माण चळवळीचे माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिक्रमण मुक्त व दर्जेदार रस्ता मिळवून देण्यासाठी महासंकल्प केला आहे. अनेक जमिनी शेत रस्त्या अभावी पडीक पडत चाललेल्या असून, काही ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे प्रकार घटना घडल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांना शेत रस्त्या अभावी शेतजमिनी कवडीमोल भावाने विकण्याची नामुष्की ओढवली आहे.
शेतकऱ्यांना शेत रस्त्यासाठी अर्ज करण्यापासून ते कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जो पिढ्यान पिढ्या संघर्ष करावा लागत आहे. तो संघर्ष थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता निर्माण चळवळीच्या वतीने व शेत व शिवपानंद रस्ता कृती समिती नेवासा तालुक्याच्या वतीने चर्चासत्र आयोजित केले आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या बाबत न्याय मिळवून देण्यासाठी नेवासा तहसील कार्यालयात तहसीलदार व त्यांचे सर्व कर्मचारी भूमी अभिलेख व त्यांचे कर्मचारी पंचायत समिती व त्यांचे अधिकारी यांचे समवेत समन्वय बैठक होणार आहे.
शेत रस्त्यांच्या समस्या निवारण्यासाठी गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर२०२४ रोजी सकाळी ९ ते १२ वाजता या वेळेत शासकीय विश्रामगृह डाकबंगला प्रवरा नदीच्या पुलाजवळ नेवासा येथे नेवासा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नेवासा तालुका शेत रस्ता व शिव पानंद रस्ता कृती समितीच्या वतीने नाथाभाऊ शिंदे सुरेगाव सागर सोनटक्के नेवासा बुद्रुक कारभारी गरड भेंडा यांनी केले आहे.