गुन्हेगारी

अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून अटक 

प्रतिनिधी किरण जाधव

अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांकडून अटक 

 

अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी (नेपाळ नागरिक ) यास राहुरी पोलिसांकडून अटक

राहुरी पोलीस ठाणे गु.र.क्र.943/24 us 376(2)(f) भारतीय न्याय संहिता rw us 6 पोक्सो कायदा अन्वये दिनांक 21. 8. 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीगत अशी की, अल्पवयीन मुलगी हिस त्याच्या परिचयातील विश्वस्त याने सुखी संसाराचे प्रलोभान देऊन तिच्याशी बालविवाह करून शारीरिक संबंध ठेवले व ही बाब लपवून ठेवली. सदरच्या बालविवाह संबंधातून सदर अल्पवयीन मुलगी ही गरोदर झाली व तिने एका बाळाला जन्म दिला त्यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे सागर हर्क घटाला वय 21 वर्ष धंदा, कुक, राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर( मूळ – नेपाळ) याचा राहुरी पोलिसांकडून शोध चालू होता. त्यास PSI खोंडे, Hc प्रविण खंडागळे, PC इफ्तिखार सय्यद यांनी आरोपीस पकडून सदर गुन्ह्यात दिनांक 23 8 2024 रोजी अटक करण्यात आली असून आरोपी हा सध्या दिनांक 26.08.2024 पर्यंत पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत.
सदर गुन्ह्याचां तपास मा पोलीस अधीक्षक  राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलूबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात PSI खोंडे, Hc प्रविण खंडागळे, PC इफ्तिखार सय्यद है करत आहे.

*तरी सर्व नागरिकांना व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपले मुलं मुली हे कोणासोबत राहतात, खेळतात, फिरतात यावर जागरूकतेने लक्ष ठेवले पाहिजे. ते कोणाच्या आमिषाला, भूलथापांना बळी पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांना शाळेत व घरी गुड टच, बॅड टच याचे शिक्षण मार्गदर्शन केले पाहिजे.*
*तसेच राहुरी गटविकास अधिकारी यांना व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांचे मार्फत आव्हान करण्यात येते की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये ग्रामसेवक हा सदर गावचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्त असतो. त्यांनी आपल्या गावात जनजागृती करून बालविवाह होणार नाहीत व त्यातून कुठलीही अल्पवयीन मुलगी गरोदर राहणार नाही याची काळजी घेऊन आपापल्या स्तरावर जनजागृती करावी. असे आपल्याला आढळून आल्यास आपण स्वतः योग्य कारवाई करून राहुरी पोलीस ठाणे येथे घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद द्यावी*

 

3.5/5 - (2 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे