उंदिरगाव गावातुन १८० भावीकांचा जत्था नर्मदा परिक्रमा साठी रवाना

उंदिरगाव गावातुन १८० भावीकांचा जत्था नर्मदा परिक्रमा साठी रवाना
टाकळीभान प्रतिनिधी – कोरोना महामारी पासुन मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्यानंतर धार्मिक सहलींचे आयोजन होत आहे.श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव व परीसरातील येथील १८० भावीकांचा जत्था रविवारी सकाळी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी रवाना झाला.यावेळी त्यांना निरोप देण्याकरीता नागरीक मोठ्या संख्येने हजर होते.
अशोक सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्यास निघालेल्या भाविकांना शुभेच्छा देत नर्मदा परिक्रमाचे महत्व विषद केले.या यात्रेचे ते आयोजक असून त्यांनी आता पर्यंत वीस धार्मिक सहलीचे आयोजन केले . ही नर्मदा परिक्रमा यात्रा १५ दिवसांची असून उंदिरगाव , ओंकारेश्वर, प्रकाशा, कटपोर, निलकंठेश्वर, गरुडेश्वर, कुबेर, महेश्वर, नेमावर, भेंडाघाट, अमरकंटक, महाराजापूर, होशंगाबाद असा प्रवास असणार आहे. ना नफा ना तोटा अशा धर्तीवर आयोजन केले आहे. यावेळी अशोक कारखान्याचे संचालक विरेश गलांडे ,जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुध्दे , संरपंच सुभाष बोधक , अशोक गलांडे ,रेवजीनाना भालदंड , बबनराव नाईक , दिलीप मोरे , सुरेश शिंदे , शिवाजी पाउलबुद्धे, सोपानराव नाईक सर , राजीव गीऱ्हे, अमोल नाईक, बाबासाहेब नाईक, विजय ताके, राजेंद्र गुंड, प्रकाश ताके , राजीव गिर्हे ,विनायक नाईक , विजय ताके , भगवान ताके , भिमराज बागुल आदी ग्रामस्थ ऊपस्थित होते.