आ.रोहित पवार ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.त्याच मतदार संघात जर “अहिल्या” मातेचा जन्म झाला.असे मोठे पवार साहेब म्हणतात…

आ.रोहित पवार ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.त्याच मतदार संघात जर “अहिल्या” मातेचा जन्म झाला.असे मोठे पवार साहेब म्हणतात…तर मग “चोंढीचा” विकास तर झालाच पाहिजे….
पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर भक्त… राजुमामा तागड मिरी अहमदनगर
ज्यांना आपण महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणतोय,असे महाराष्ट्राचे नेते,महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल,अहिल्या माते पेक्षा आपले नातू आमदार रोहित पवार यांना ग्रेट समजणारे आजोबा माननीय शरद पवार साहेबानी गेल्या काही दिवसा पूर्वी एका सभेत आणि पत्रकार सभेत म्हटले होते की,ज्या मतदार संघाचे आ.रोहित पवार प्रतिनिधित्व करतात,त्याच मतदार संघात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा” जन्म झाला.लोकांनी त्याचा अर्थ आ.रोहित पवार अहिल्या माते पेक्षा मोठे कसे…??म्हणून शरद पवार साहेबांचा विरोध पण केला आणि तो साहजिक पण आहे. कारण ज्या अहिल्या मातेने “अटक ते कटक आणि काश्मीर ते कन्याकुमारी” पर्यंत एखाद्या पुरुषाला सुद्धा लाजवेल,असा स्वच्छ प्रतीचा तब्बल 29 वर्ष राज्य कारभार करून रयतेच्या मना मनात आपले नाव कोरले. त्याच अहिल्या मातेला जर लहान कोणी समजत असेल तर ते हास्यास्पदच म्हणावे लागेल.तेही महाराष्ट्राच्या जाणत्या राजेच्या तोंडून जर आमच्या अहिल्या मातेला आ.रोहित पवार यांना नातू प्रेम म्हणून जर होत असेल तर मग आता संधी आली आमच्या करोडो भारतीयांच्या श्रद्धास्थान असलेल्या अहिल्या मातेच्या जन्म भूमीचा विकास करण्याची…पवार साहेब होऊनच जाऊ द्या.आपला नातूच जर अहिल्या मातेच्या जन्म गावचा आमदार असेल तर “चोंढी”चा विकास तर झालास पाहिजे.आपल्या नातवाच्या विकास कामातून आम्हाला सुद्धा कळू द्या.आ.रोहित पवार खरोखर अहिल्या माते पेक्षा महान आहेत.आता तर महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल पण आपल्याच हातात आहे.तर एकदाचे होऊनच जाऊ द्या.आपल्या कर्तृत्वातून “चोंढी”ला अ-तिर्थक्षेत्राचा दर्जा आणि भरभरून निधी जर दिला तर मला वाटते नक्कीच आपला नातू आ.रोहित पवार यांना आम्ही मोठे समजू.आणि ती वेळ आली आमच्या अहिल्या मातेच्या जयंती पर्वावर घोषित करण्याची.31 मे ला जर आपल्या आशीर्वादाने व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि ज्या मतदार संघात आ.रोहित पवार नेतृत्व करतात त्या “जामखेड-कर्जत” मतदार संघातील “चोंढी”या आमच्या अहिल्या मातेच्या जन्म भूमीचा जर सर्वांगीण विकासाची घोषणा येत्या 31 मे रोजी आपल्या तोंडून जसे अहिल्या माते पेक्षा आ.रोहित पवार यांना मोठे दाखविण्याचा मागील काही दिवसात आपल्या वक्तव्यातून प्रयत्न झाला.तर आपण स्वतः आणि आपले पुतणे उपमुख्यमंत्री अजित दादा आणि नातू आ.रोहित पवार 31 मे ला चोंढी येथे जयंती धुमधडाक्यात जर साजरी करीत आहात.तर त्याच दिवशी “चोंढी” विकास आराखड्या साठी 500/-कोटी निधी मंजूर करून “चोंढी” ला पंढरपूर,शिर्डी,आळंदी सारख्या तिर्थक्षेत्राच्या यादीत आमच्या माय माऊली अहिल्या मातेचं जन्म स्थान सुद्धा “अ-तिर्थक्षेत्र”च्या यादीत नाव समाविष्ट झाले पाहिजे.तरच आम्ही ज्या मतदार संघात आ.रोहित पवार नेतृत्व करतात त्याच मतदार संघात अहिल्या मातेचा जन्म झाला.हे आपले वक्तव्य सार्थ समजू…अन्यथा याला शुद्ध राजकारण म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.
तर मग आपल्या वक्तव्याचा वीसर न पडू देता,येत्या 31 मे ला आपल्याच तोंडून “चोंढी”विकासाचा गजर अहिल्या प्रेमी जनतेला कळू द्या.आम्ही सुद्धा आपले स्वागतच करू.