राजकिय
टाकळीभान -घोगरगाव रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नामदार गडाख आमदार कानडे यांचा लवकरच भव्य नागरी सत्कार…

टाकळीभान -घोगरगाव रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नामदार गडाख आमदार कानडे यांचा लवकरच भव्य नागरी सत्कार…
टाकळीभान घोगरगाव रस्ता पंधरा वर्षापासून प्रलंबित होता, या रस्त्याची अतीशय दुर्दशा झाली होती व श्रीरामपुर-नेवासा तालुक्यांच्या गावांना जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा आहे, या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या या कामाची दखल घेऊन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर करून चांगल्या प्रतीच्या दर्जाचे काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे, व हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल या दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा लवकरच भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे सेवा निवृत्त कालवा निरीक्षक आबासाहेब पटारे व ग्रामस्थ यांनी सांगितले आहे.