श्रीरामपुरात महंत रामगिरी महाराज समर्थन रॅलीत आमदार नितेश राणे, सागर भैय्या बेग, मस्के महाराज व इतरांनी केले आवाहन

प्रतिनिधी सागर शेटे
श्रीरामपुरात महंत रामगिरी महाराज समर्थन रॅलीत आमदार नितेश राणे, सागर भैय्या बेग, मस्के महाराज व इतरांनी केले आवाहन
श्रीरामपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोडवर राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त रॅलीमध्ये, महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशात होत असलेल्या हिंदू अत्याचारा विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उपस्थित त्यांना संबोधित करताना, हिंदू मुलींनी लव जिहादला बळी पडू नये. ज्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होत असेल ते त्या ठिकाणी ठेवा लव जिहाद्यांच्या नादी लागू नका. आपल्या भगिनींची फसवणूक त्यांचे आयुष्य खराब होत आहे. हिंदू धर्म म्हणून आपण स्वाभिमानी जगले पाहिजे म्हणून तर रामगिरी महाराज काय चुकीचे बोलले हे समजत नाही. त्यांच्या बुद्धिवादी लोकांनी सांगावे की रामगिरी महाराज जे बोलले ते चुकीचे आहे. अशा वक्तव्यामुळे एवढं रान वाजविण्याचे काहीच कारण नाही. या वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांना युट्युब वर धमक्या दिल्या जात आहेत, रामगिरी महाराज यांच्या केसालाही धक्का लावला तर असा इशारा संबोधित करताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला. तसेच रामगिरी महाराज यांचे वक्तव्य मागे घेणार नाही हिंदू धर्म म्हणून रामगिरी महाराज यांच्या मागे उभे राहावे लागणार आहे. लहान लहान मुलांचे जे धर्मांतरण केले जात आहे. कमी वयात त्याला मारण्याची धमकी देत आहेत, नमाज शिकविले जाते, हे किती भयान आहे असेही यावेळी आमदार राणे यांनी बोलून दाखवले.
तसेच महंत रामगिरीजी महाराज काही चुकीचे बोलले नाही. ते बोलले ते खरं बोलले आहेत. या आधीही हे आपल्याला कित्येक लोकांच्या तसेच मुस्लिम धर्मीयांच्या लोकांच्या तोंडून ऐकले आहे. हिंदू धर्मीयांवर अत्याचार करणे किंवा अन्याय करणे सोडून द्या नाहीतर जशास तसे उत्तर देण्यात येईल. महाराष्ट्र मध्ये मुस्लिम एरियामध्ये बांगलादेशी येऊन गुपचूप राहतात व तेथील मुस्लिमांना भडकावून देतात. त्यांच्या अगोदर बंदोबस्त करण्यात यावा हिंदू वरील अन्याय खपवून घेणार नाही. असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांनी केली.
यावेळी म्हस्के महाराज तसेच इतर मान्यवरांनी आपली आपली मते मांडली यावेळी हजारो संख्येने हिंदू जनसमुदाय उपस्थित होता.