स्वतः दलित वस्ती येथे जाऊन डॉ. वंदना मुरकुटे यांनी साजरी केली अण्णाभाऊ साठे यांची जयंती…

–महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजात बदल झाल्यास खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल.
-स्वतः दलित वस्ती येथे जाऊन डॉ. वंदना मुरकुटे यांनी साजरी केली अण्णाभाऊ साठे यांची जयंती…
टाकळीभान: देशासाठी झिजणाऱ्या या महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये बदल झाल्यास खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल असे प्रतिपादन मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी टाकळीभान येथील दलित वस्ती येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करताना केले. व एक लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष दलित वस्ती त भेट देऊन, त्यांची अस्थिने त्यांनी विचारपूस करत, त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेत, एक महापुरुषाची जयंती साजरी करत, त्यांचे विचार मांडत असे दुर्मिळ चित्र, व एक विलक्षण अनुभव यावेळी पहावयास मिळाला. व डॉ वंदनाताई मुरकुटे यांच्या भेटीने तेथील नागरिक महिला भारावून गेल्या, व त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. व या प्रकारे आजपर्यंत कोणी याप्रकारे आमच्यापर्यंत लोकप्रतिनिधी आले नाही, व डॉ. मुरकुटे आल्याबद्दल त्यांना मनस्वी आनंद झाला. यावेळी त्या लोकवस्तीतच येथील माता भगिनी नागरिकां समवेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. कार्लस साठे म्हणाले की हे झालेले महापुरुष या आपल्या तळागाळातल्या, दलित समाजाच्या उद्धारासाठी अवतरलेले देवच आहेत, व या दलित, गरीब समाजाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे अशी त्यांची खरी तळमळ होती. त्यांचे विचार आपण अंगीकारावे असे ते म्हणाले. याप्रसंगी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाल्या की या महापुरुषांचे खरे काम, येथील माता भगिनी, बंधू यांना माहिती व्हावे म्हणून या ठिकाणी लोकवस्तीत येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. व या महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन काही कुटुंबांमध्ये बदल झाले, चांगले विचार रुजवले गेले तर ती खऱ्या अर्थाने या महापुरुषांना श्रद्धांजली ठरेल व खरी जयंती होईल असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी या दलित वस्तीतील महिला माता-भगिनी यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन, मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी त्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन राऊत यांनी केले. सागर बोरुडे यांनी आभार मानले.यावेळी येथील युवक व माता भगिनींच्या हस्ते मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी रावसाहेब रणनवरे, आबासाहेब बोरुडे, सुभाष बोरुडे ,शंकर बोरुडे,रुखमाबाई रणनवरे, छाया शिंदे, अलका रणनवरे ,गुलाबाई शिंदे , पुनम रणनवरे, शहाबाई बोरुडे, संगीता बोरुडे ,छाया बोरुडे ,सविता बोरुडे, लता बोरुडे, अनुराधा बोरुडे, पूजा बोरुडे, राजू मोरे, राजू खरात, गोरख शिंदे, वनिता शिंदे, रुक्मिणी साळवे ,लक्ष्मण बोरुडे आदींसह पुरुष वर्ग, महिला माता भगिनी,मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकळीभान: येथील दलित वस्ती वार्ड क्रमांक 4 येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. कार्लस साठे सर, अर्जुन राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.