*खिर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवगत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश वाटप* .
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवगत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शाळेकडून मोफत पाठ्यपुस्तक तसेच शाळेचा गणवेश व बुट वितरण सोहळा आज संपन्न झाला , हे वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प सोबत पाठ्यपुस्तक देऊन करण्यात आले.अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दशरथ पिसे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी सरपंच सुनीता बाबासाहेब कांबळे, उपसरपंच उज्वला रामभाऊ शिंदे हे प्रमुख मान्यवर होते, यावेळी सरपंच सौ सुनीता बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व बुटाचे किट वाटप करण्यात आले, यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चितळकर, अप्पासाहेब माकोणे, तात्यासाहेब बनसोडे, रेवन नाथ माळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप रेवाळे , हरिभाऊ रेवाळे, रामभाऊ शिंदे, केतन जाधव, दत्तात्रय देवकाते, नितीन मासाळ, अनिल पवार, महेश माळी, जालिंदर माळी, अमोल कांबळे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक खिर्डी मधील सर्व वर्गशिक्षक तसेच वर्गशिक्षिका व पत्रकार महेश मासाळ व पत्रकार संतोष बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा