चिंचाळे गडदे आखाडा सोसायटीत विरोधकांचा धुव्वा…*

*चिंचाळे गडदे आखाडा सोसायटीत विरोधकांचा धुव्वा…*
राहुरी तालुक्यातील चिंचाळे व गडदे आखाडा ग्रुप सोसायटीच्या निवडणुकीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले असून विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला.एकूण 322 मतदार संख्या असलेल्या सोसायटीत 282 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हनुमान तरुण मंडळाच्या एकूण बारा उमेदवारांपैकी निवडणूक होत असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवार जवळपास 100 ते 110 मतांच्या फरकाने निवडून आले. याचे सर्व श्रेय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना व सभासदांना असल्याचे नारायणराव तमनर यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षात पूर्णपणे पारदर्शी कारभार केल्यानेच सभासदांनी मतदानातून कौल दिला.विरोधी वीरभद्र जनसेवा मंडळाला मात्र एकही जागा मिळवता आली नाही. शिवाय सर्वच्या सर्व उमेदवारांना 80 ते 85 एवढ्याच मतावर त्यांना समाधान मानावे लागले. इतर मागास प्रवर्गाची जागा रिक्त असल्याने बारा जागेवरील विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस. वाय. आगळे यांनी करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली व विजयाच्या घोषणा दिल्या. विजय सभेत विद्यमान चेअरमन नारायणराव तमनर यांनी सोसायटीने पिक कर्ज म्हणून 1कोटी 20 लाख रु. इतका कर्जपुरवठा शेतकऱ्यांना कोणत्याही गटाचा विचार न करता केल्याचे सांगितले. तसेच जून 2022 अखेर संस्था बँक पातळीवर शंभर टक्के वसुलीस पात्र होईल असा विश्वास व्यक्त केला. विजयी झालेल्या उमेदवारांनामध्ये *सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघातून* 1)जोरी सुनिता फकीरचंद मिळालेली मते 196. 2)गडदे तुकाराम लहानु 192.3)ढाकणे बाबासाहेब पांडुरंग 188. 4)आघाव दगडू भिवा 186.5) बाबाजी सखाराम 185. 6) चितळकर लहान बाई जालिंदर 185. 7) सांगळे जालिंदर मच्छिंद्र 184.8) ज्ञानदेव भाऊसाहेब 178 तर विरोधी गटातील उमेदवारांना 75 ते 87 इतकी मते मिळाली. *अनुसूचित जाती जमाती* *प्रतिनिधी मतदारसंघ* पवार विठ्ठल सोमा 195. *महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघ* 1)कोळसे रुपाली नवनाथ 189. 2)तमनर निर्मला नारायणराव 188 मते तर विरोधी गटातील उमेदवारांना 83 ते 84 इतकी मते मिळाली *इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ* रिक्त पद. *विमुक्त जाती* *भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून* गडदे दत्तात्रय लहानु 187 इतकी मते मिळाली. हा विजयश्री खेचून आणण्यासाठी हनुमान तरुण मंडळाचे सुभाष आघाव, मोहनराव जोरी, नामदेव आघाव, बाळासाहेब जोरी, कुशीनाथ गडधे, बाबासाहेब वडीतके, योगेश सानप,कैलास हाके, रमेश गडदे,बाबासाहेब कोळसे आदींनी परिश्रम घेतले. *निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.*