राहुरी पोलिसांनी मोपेड वरुन गांजाची वाहतुक करणारा व्यक्तीस केले जेरबंद

राहुरी पोलिसांनी मोपेड वरुन गांजाची वाहतुक करणारा व्यक्तीस केले जेरबंद
*620 ग्रॅम गांजासह 70000 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त*
दि.19/3/2024 रोजी एक इसम हा अग्नी शस्त्रासह(पिस्तूल सह) मनमाड ते राहुरी जाणारे रोडने हिरो ॲक्टीवा मोटर सायकल एम एच 17 सी डी 1883 वरुन येणार असल्याची गोपनिय बातमी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याबाबत अधिनस्त अधिकारी /अंमलदार यांना आदेशित करण्यात आले होते. नेमलेल्या पथकाने पंचासमक्ष छापा टाकुन कारवाई केली असता सदर ताब्यात घेण्यात आलेला इसम विकी बाळु आव्हाड वय 21 वर्ष, धंदा मजुरी, रा.घुलेवाडी रोड राजापुर ता.संगमनेर ता.राहुरी जि.अहमदनगर यांचेकडे मोपेड च्या डिग्गी मध्ये मध्ये पिस्तूल ऐवजी गांजा मिळाल्याने नायब तहसीलदार श्रीमती दळवी यांचे समक्ष सविस्तर छापा पंचनामा करुन आरोपीच्या ताब्यातुन एकुण 6000 रुपये किंमतीचा 620 ग्रॅम गांजा सह 70,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास Api पिंगळे करत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सपोनी पिंगळे, नायब तहसीदारांर श्रीमती दळवी, पोलीस हवालदार प्रवीण बागुल, विकास साळवे, सतीश आवारे,सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने, प्रमोद ढाकणे , सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, गोवर्धन कदम, अशोक शिंदे, आजीनाथ पाखरे यांनी केलेली आहे.