घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस सोनई पोलीसांनी केले मुद्देमालासह जेरबंद

घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस सोनई पोलीसांनी केले मुद्देमालासह जेरबंद
सोनई (वार्ताहर) —नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील घरफोडीतील फरार आरोपीस सोनई पोलीसांनी मुद्देमालासह ताब्यात घेवून जेरबंद केले. पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दिनांक ०४/०८/२०२३ रोजी ५ वा.ते दिनांक ०८/०८/२०२३ रोजी ११/३० वा.चे सुमा. फिर्यादी गणेश भिमपुरी गोसावी रा. कांगोणी रोड, गोसावी मळा, सोनई ता. नेवासा यांचे राहते घराचा दरवाजा कशाचे तरी साह्याने उचकाटुन घरफोडी चोरी करुन त्यांचे घरातील सॅमसंग कंपनीचे फ्रिज, भारत कंपनीची गॅस टाकी, गव्हाचे ५० कि.ग्रॅम वजनाचे ८ कट्टे, साखरेचा कट्टा, लहानमोठी स्टिलची व पितळाची भांडी तसेच फिर्यादी यांचे शेजारी राहणारे साक्षीदार सचिन लक्ष्मण माने यांचेही घरातील एच.पी. कंपनीच्या दोन गॅस टाक्या व पितळाची भांडी असा एकुण ३५,४००/-रु.कि.चा मुद्देमाल चोरुन नेला आहे. वगैरे म।। चे फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सागर चांगदेव शिंदे रा. हनुमानवाडी ता. नेवासा हा गुन्हा घडले पासुन फरार झाला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात फरार आरोपी सांगर चांगदेव शिंदे रा. हनुमानवाडी ता. नेवासा याचा शोध घेत असताना स.पो.नि.शेळके सो. यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी नामे सागर चांगदेव शिंदे हा सोनई गावात दत्तनगर रोडवर उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि. शेळके सो. यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदार यांना माहीती देवुन आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्याने तपास पथकातील अंमलदार यांनी लागलीच बातमीतील ठीकाणी जावुन सापळा लावुन आरोपीचा शोध घेत असताना दत्तनगर रोडवर एक ईसम संशयीत रित्या उभा असलेला दिसल्याने तपास पथकातील अंमलदार यांनी त्यास तपासकामी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे त्यास विश्वासात घेवुन गुन्ह्यातील गेले मालाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली असता त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दोन गॅस टाक्या काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या असुन आरोपीत यास गुन्हयाचे पुढील तपासकामी अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने ०२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोना .बाळासाहेब बाचकर हे करत आहे.
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक. राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कलुबर्मे
पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे
मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे स.पो.नि. शेळके पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे . तसेच
पोना.बाळासाहेब बाचकर, पोकाॅ नीखील तमनर, पोकॉ .ज्ञानेश्वर आघाव, पोकाॅ .रवि गर्जे यांनी केली आहे.