सरकारी लाचखोर बाबूना लाच घेताना पकडले रंगेहाथ नगर रचना विभाग नगर परिषद पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील अंबादास गोपीनाथ साठे यानी तक्रारदार यांना बिअर बार परमिट रूम परवाना काढायचा असल्याने त्यांनी त्याकरता आवश्यक असलेला नगरपरिषद चा नाहरकत दाखला मिळणे करता नगरपरिषद पाथर्डी ते अर्ज केला होता सदर अर्जावरून ना हरकत दाखला देणे याकरिता आरोपी लोकसेवक अंबादास साठे यांनी मुख्याधिकारी लांडगे यांचे करीता पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याने तक्रारदार यांनीलाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करून खंडणी मागत आहे याचा खुलासा केल्यानंतर संबंधित विभागाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी मुख्याधिकारी लांडगे यांच्या नावे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्या तडजोडी अंती rs.12000 स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी अंबादास साठे याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पाथर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास हरीश खेडकर पोलिस उपाधीक्षक लाचलुचपत विभाग अहमदनगर हे करीत आहे याअनुषंगाने लाचखोर अधिकाऱ्यांना कधी चपराक बसेल स्वतः हजारो ने लाखोची पेमेंट असतानाही गरीब किंवा अडलेल्या व्यक्तींकडून लाच मागताना यांना लाज कशी वाटत नाही ग्रामीण भागामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे त्यानंतर त्यांना जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकार बंद होणार नाहीत असा नागरिकांचा ठाम विश्वास आहे हजारो तरुण नोकरीच्या शोधात असतानाही असे लाचखोर अधिकारी लाच स्वीकारून परत दुसरीकडे कामावरती हजर होतात याचे दुष्परिणाम देणे-घेणे वाढले आहे ज्या व्यक्तीने लाच घेतली त्या व्यक्तीला कामातून बंडतर्फ केल्यास परत लाच घेण्यास कोणी तयार होणार नाही तरच कामांमध्ये पारदर्शकता येईल
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.