तालुक्यातून भेर्डापूर येथे प्रथमच मोफत मोतीबिंदू मुक्तगाव अभियान राबविण्यात आले

श्रीरामपूर तालुक्यातून भेर्डापूर येथे प्रथमच मोफत मोतीबिंदू मुक्तगाव अभियान राबविण्यात आले
प्राथमिक आरोग्य केंद्र पढेगाव , प्राथमिक उपकेंद्र भेर्डापूर व ग्रामपंचायत भेर्डापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत भेर्डापूर उपकेंद्रात आज दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी , सकाळी ठिक ९:३०ते दुपारी ०१ वाजेपर्यत मोफत मोतीबिंदू मुक्तगाव अभियान राबविण्यात आले असून
भेर्डापूर उपकेंद्रात एकुण ६६ रूग्णांनी आपली नेत्र तपासणी केली आहे. सदर मोफत मोतीबिंदू मुक्तगाव अभियान राबविण्यासाठी डॉ.राजश्री देशमुख तालुका आरोग्य अधिकारी , डॉ.संदिप सांगळे सर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.संतोष वैरागर वैद्यकीय अधिकारी, डॉ.आम्रपाली भुईंगळ नेत्रचिकीत्सक , डॉ.शैलेष पवार यासर्वांचे नेत्र तपासणी अभियानास विशेष बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले , त्याचे प्रमाणे भेर्डापूर ग्रामपंचायत सरपंच सौ.अनिता चंद्रकांत कांदळकर व उपसरपंच श्री प्रतापराव कवडे पाटील यांचेही नेत्रतपासनी अभियानास योगदान आहे. तसेच गरजे काका,गट प्रवर्तक सोनाली भवार ,साळवे सिस्टर, आशा सेविका मोहिनी दांगट ,निर्मला कहांडळ ,आरोग्य सेवक गणेश अहिल्ये यांचेही सहकार्य लाभले आहे.
मोफत नेत्रतपासणी व मोफत मोतिबिंदू शिबीर अभियानास भेर्डापूर गावातून चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळाला आहे.