अपघात
तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला

तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला
शहरातील मन्यारवाडी परिसरामध्ये एका तरुणाचा सोमवार (दि.28) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेह शेतातआढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मनोहर विलास पुंड(वय 38 रा. रंगार चौक, गेवराई) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह मन्यारवाडी शिवारात आढळून आल्याने येथील घटनास्थळी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, डी. वाय. एस.पी राजपूत यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. पुंड यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अस्पष्ट असून शवविच्छेदनाच्या अहावालनंतरच स्पष्ट होणार आहे.