*गेवराई करांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या पिता पुत्रांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या*

*गेवराई करांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या पिता पुत्रांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या*
पुण्यातून अब्बास व त्यांच्या मुलाला केली अटक
बचत गटाच्या नावाखाली महिलांकडून कागदपत्रे घेऊन परस्पर विविध बँकांकडून कर्ज उचलून ३६ लाखांचा गैरव्यवहार करत पसार झालेल्या गेवराईतील पिता-पुत्रास ३० सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,अब्बास महेबूब सय्यद (३९) व आवेज अब्बास सय्यद (१९, दोघे रा. संजयनगर, गेवराई, हमु, नरे, सिंहगड रोड, पुणे) असे त्या पिता-पुत्राचे नाव आहे.विमलबाई बंडू रोकडे (रा. संजयनगर, गेवराई) यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी गेवराई ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शकिला अब्बास सय्यदसह अब्बास महेबूब व आवेज सय्यद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होता आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपाधीक्षक संतोष वाळके, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत बर्डे, हवालदार श्रीकृष्ण हुरकुडे, पो.ना. राजू पठाण यांनी मोठ्या शिताफीने पिता-पुत्रास ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल होण्यापुर्वीच सहपरिवार यांनी पलायन केले होते २०२० मध्ये विमलबाई व इतर १६ महिलांकडून बचत गटामार्फत लघु उद्योगासाठी कर्जप्रकरणे मंजूर करून देतो म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे तिघांनी पुणे गाठले. घेतली. स्वाक्षऱ्या व अंगठे घेतले.
दरम्यान, उपनिरीक्षक भारत बर्डे यांचे पथक २८ सप्टेंबरलाच पुण्याला रवाना झाले होते. दोन दिवस मुक्काम ठोकल्यावर ३० सप्टेंबरला सकाळी दहा वाजता अब्बास महेबूब, आवेज अब्बास यांना ताब्यात घेतले तर शकिला अब्बास घरी आढळली नाही. दरम्यान, पिता पुत्र कंपनीत कामाला आहेत, त्यांच्यावर दोन दिवस पथकाने पाळत ठेवून अटक केली तिन्ही आरोपींनी एसबीआय, अन्नपूर्णा, बंधन, यशोदा बँकेसह भारत, आयडीएफसी या खासगी फायनान्सकडून महिलांच्या नावे परस्पर कर्ज उचलले. कर्जाची रक्कम महिलांच्याच खात्यात जमा झाली; पण या तिघांनी ती परस्पर उचलली. त्यामुळे महिलांचे बँक खाते या तिघांनी नेमके कसे हाताळले हे तपासातच समोर येणार आहे.
त्यानंतर परस्परच कर्ज उचलले. एकूण ३५ लाख १० हजार १०५ रुपयांचे कर्ज उचलले. महिलांकडून ओरड झाल्यावर दोन एकर शेती व घर विकून सात महिने उलटून गेवराई पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. त्यामुळे हे प्रकरण १६ जुलै रोजी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तपासकामी आर्थिक गुन्हेदरम्यान, गुन्हा नोंद झाल्यानंतर शाखेकडे सोपविला होता
सूचना:- या डिजिटल मीडिया पोर्टल मध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्या, विविध विषयावरील लिखाण, जाहिराती, डॉक्यूमेंट्री, यांच्या लिखाणाशी संपादक सहमत असतील असे नाही.कोताही वाद निर्माण झाल्यास तो फक्त राहुरी न्यायालया अंतर्गत चे मर्यादित राहिल…….