पोलिसाच्या डोक्यात दगड मारला तरी 307 नाही शासनाने कार्यवाही केलेल्या वाहन परस्पर पळवली दरोडा वारे प्रशासन

पोलिसाच्या डोक्यात दगड मारला तरी 307 नाही शासनाने कार्यवाही केलेल्या वाहन परस्पर पळवली दरोडा वारे प्रशासन
*शासनाने कार्यवाही केलेल्या वाहन पळवले प्रकरणी दरोडा आणि पोलिसांच्या डोक्यात दगड मारला तरी ३०७ नाही वारे प्रशासन*
राजकीय आश्रय बघून पोलिस गुन्हा दाखल करतात हे मात्र सिद्ध झाले आहे.
पोलिसांना मारहान करूणही यामध्ये जिवे मारण्याचे कलम ३०७ वगळले असल्याने पोलिस प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे.
ग्राम पंचायत निवडणूकीचे मतदान सुरू असतांना गेवराई तालुक्यातील केकत पांगरी तांड्यावर दगडफेक झाली ती दगडफेक पोलिसांवर झाली यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले एकाचा पाय फॅक्चर झाला तर दुसऱ्यांच्या डोक्यात दगड मारल्याने गंभीर ईजा झाली आहे या प्रकरणी ३५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र यामध्ये लावलेल्या कलमावरूण सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रक्रीयेत संशय येत आहे कारण पाच ट्रॅक्टर पळवले तर दरोडा होतो मात्र पोलिसांना मारहान होऊनही कलम ३०७ लागत नाही याचं गणित मात्र कोणालाही कळेनासा झाले आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , ( दि १८ डिंसेबर ) रोजी गेवराई तालुक्यात ७६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले संपुर्ण तालुक्यात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली परंतू केकत पांगरी तांड्यावरील बूथ केंद्रावरील मशीन वारवार बंद पडत होती आठ वाजण्याच्या दरम्यान पोलिस निरीक्षकां समोर या ठिकणी दगडफेक झाली यामध्ये दोन पोलिस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले एकाचा पाय फॅक्चर झाला तर दूसऱ्याच्या डोक्यात दगड लागल्याने गंभीर ईजा झाली या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या फिर्यादी वरूण ३५ जणांविरूद्ध गुन्हा दाखलही झाला परंतू सदरच्या गुन्हा नोंद करण्यामध्ये पोलिस कसे ? चुकले अशी चर्चा होऊ लागली आहे तसेच काही दिवसांपुर्वी बसस्थानकातून पाच ट्रॅक्टर पळवले तर दरोड्याचा गुन्हा दाखल केला परंतू पोलिसांना मारहान करूणही यामध्ये जिवे मारण्याचे कलम ३०७ वगळले असल्याने पोलिस प्रशासनावर संशय व्यक्त केला जात तसेच राजकीय आश्रय बघून पोलिस गुन्हा दाखल करतात हे मात्र सिद्ध झाले आहे तसेच दरोड्याचेही कलम कमी करा जेणे करूण कुनावर अन्याय होणार नाही तसेच वरिल या दोन्ही गुन्ह्यात प्रशासन आहे पोलिसांवर झालेली दगडफेक निंदनिय आहे मात्र यामध्ये ज्यांनी पोलिसांवर हात टाकला अश्या लोकांना शासन होणे गरजेचं आहे परंतू थातूरातूर कार्यवाईमुळे अनेकांचे मनोबल वाढेल यात मात्र दूमत नाही .