राजकिय
सरपंचासह दोन सदस्य अपाञ, जिल्हाधिर्यांचा आदेश, सरकारी जागेतील आतिक्रमण भोवले.

. सरपंचासह दोन सदस्य अपाञ, जिल्हाधिर्यांचा आदेश, सरकारी जागेतील आतिक्रमण भोवले.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील राजकिय दृष्ट्या महत्वाच्या आसलेल्या घुमनदेव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह दोन सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदिनुसार जिल्हाधिकार्यांनी या तीन सदस्यांना अपाञ ठरवल्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. या निकालामुळे सरकारी जागेत अतिक्रमण करणाऱ्या परीसरातील सदस्यांचे धाबे दणाणले आहे.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्व भागातील राजकिर दृष्ट्या प्रतिष्ठेच्या आसलेल्या घुमनदेव ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांची चुरशिची निवडणुक जानेवारी २०२१ मध्ये झाली होती. या निवडणुकित नामाप्र प्रवर्गातुन बाळासाहेब मारुती कांगुणे, अनु, जमाती स्ञी प्रवर्गातुन भारती मंगेश गायकवाड, सर्वसाधारण स्ञी मधुन सोनला अशोक गायकवाड, अनु. जाती मतदार संघातुनगिताराम भिमाजी जाधव, सर्वसाधारण स्ञी मधुन उज्वला बाळकृष्ण कांगुणे, अनु.जमाती प्रवर्गातुन श्रीपत रावसाहेब गायकवाड तर नामाप्र स्ञी प्रवर्गातुन हिराबाई दिलीप शिंदे हे उमेद्वार विजयी झाले होते व उज्वला बाळकृष्ण कांगुणे यांची सरपंच पदी निवड झाली होती.
निवडणुकिनंतर लगेच निवडुन आलेल्या तीन सदस्यांविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत आधिनियम १९५८ चे कलम १४ पोटकलम ( ज ) (३ ) आन्वये जिल्हाधिकारी यांचेकडे सदर सदस्यांनी सरकारी मिळकतीवर अतिक्रमण करुनही निवडणुकिचे नामनिर्देशन पञ दाखल करताना खोटे शपथ पञ दाखल करुन फसवणुक केली आहे. सरकारी आगर ग्रामपंचायतीच्या जागेत आतिक्रमण करुन रहात आसल्यास त्या सदस्याची निवड कायद्यातील तरतुदीनुसार आपाञ ठरत आसल्याने त्यां तीन सदस्यांच्या निवडी रद्द ठरविण्यात याव्यात व या सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास अपाञ ठरविण्यात यावे असा विवाद अर्ज तीन वेगवेगळ्या अर्जदारांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कोर्टात दाखल केला होता. रणजित प्रताप बोडखे यांनी सरपंच उज्वला बाळकृष्ण कांगुणे यांच्या विरोधात, राजाराम लहु रजपुत यांनी भारती मंगेश गायकवाड यांच्या विरोधात तर बापु नवले यांनी बाळासाहेब मारुती कांगुणे यांच्या विरोधात विवाद अर्ज दाखल केले होते.
या दाखल अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदाराच्या वतीने दाखल कागदपञ, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे अहवाल तपासुन जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजुर करुन उज्वला बाळकृष्ण कांगुणे यांना सरपंच तसेच सदस्य पदावर तसेच बाळासाहेब मारुती कांगुणे व भारती मंगेश गायकवाड यांना सदस्यपदी रहाण्यास आपाञ ठरवत त्यांचे ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द ठरवत आसल्याचे आदेशात नमुद करुन संबधिताना प्रस्तुत आदेशाच्या विरुध्द विभागिय आयुक्त, निसिक विभाग नासिक यांचेकडे अपिल दाखल करण्यास १५ दिवसाचा अवधी देत आसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.
या निकालामुळे आता या ग्रामपंचायतीत फक्त चार सदस्य शिल्लक राहीले आहेत. सरपंच अपाञ ठरल्याने कामकाजाची जबाबदारी आता उपसरपंच यांच्याकडे जाणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत सदस्याच्या सरकारी जागेतील अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सदस्याला आपाञ ठरवण्याचा हा तालुक्यातील पहीलाच आदेश आसल्याने परीसरातील विवाद अर्ज दाखल झालेल्या काही ग्रामपंचायत सदस्यांना धडकि भरली आहे.
Rate this post