दिवसा ढवळ्या गँगवॉर? गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या

दिवसा ढवळ्या गँगवॉर? गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या
जालना शहरातील मंठा चौफुली भागात गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना आज दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान घडली आहे. गजानन तौर हे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक होते. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना तातडीनं शहरातील दीपक हाॅस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं. मात्र यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे. गजानन तौर यांना अज्ञातांनी तीन गोळ्या मारल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा घाटी रुग्नालयात आणण्यात आला आहे यानंतर त्यांच्या शवाचे इन कॅमरा शवविच्छेदन करण्याचे ठरले. यामुळे त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजी नगर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यानंतरच नेमक्या किती गोळ्या लागल्या ते समजू शकेल.