बीडमध्ये पोलिस कर्मचार्याकडून महिलेवर बलात्कार

बीडमध्ये पोलिस कर्मचार्याकडून महिलेवर बलात्कार
बीड येथील मुख्यालयात असलेल्या पोलिस कर्मचार्याने 24 वर्षीय महिलेला स्वत:च्या घरी नेहून तिच्यावर जबरदस्तीनेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याविषयी कोणाला काही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची व तुझ्यासह परिवाराला जिवे मारण्याची धमकी पिडीतेला दिली आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचार्याविरूध्द शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, पोलिस कर्मचार्याची नियुक्ती पोलिस मुख्यालयात असल्याचे सांगितले. महिनाभरापूर्वीच असा काहीसा प्रकार घडला होता. या प्रकरणात काही पोलिस कर्मचार्यांची नावे समोर आली होती. मात्रयामध्ये कोणाची तक्रार न आल्याने कारवाई झाली नाही. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत एक 24 वर्षीय महिला संध्याकाळच्या सुमारास माहेरून आल्यानंतर रिक्षाची वाट पाहत उभी होती.त्याचवेळी पीडितेच्या गावातील तिच्या ओळखीचा पोलिस कर्मचारी मोटारसायकलवर त्याठिकाणी आला व पीडितेला जायचे का? असे विचारून तिला मोटारसायकलवर बसविले. त्यानंतर पीडितेला स्वत:च्या घरी नेहून तिला जबरदस्तीने आतमध्ये ओढले.त्यावेळी पोलिस कर्मचार्याच्या घरात कोणी नव्हते. त्यामुळे पोलिसाने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला.पोलिस कर्मचारी हनुमान श्रराम कमवाडे याच्याविरूध्द कलम 376,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.