ST प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळु नये मुख्यमंत्री यांना निवेदन.

ST प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळु नये मुख्यमंत्री यांना निवेदन.
सध्या ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहेत या पार्श्वभूमीवर ST प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळु नये म्हणून आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र विरोध होतांना दिसत आहे माजलगाव जिल्हा बीड येथील तहसीलदार यांच्या मार्फत ११/९/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना एकलव्य जनता दल महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा अध्यक्ष सोपान बाबूराव ठाकरे यांच्या कडून देण्यात आले धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावी याकरिता आंदोलने उपोषणे उभारली जात आहे त्यांच्या अशा मागण्यामुळे ST विरुद्ध धनगर समाजामध्ये भविष्यामध्ये जातीय तेड निर्माण होऊ शकते तसेच आदिवासी समाज मागील ७५ वर्षांमध्ये कुठेतरी समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे आत्ता कुठेतरी समाजामध्ये आरक्षणा बद्दल जागृता होत आहे जंगलात डोंगर भागात राहणारा आदिवासी अजुनही आरक्षणा पासून वंचित आहे आदिवासी समाजामध्ये ४८ जमाती आहेत त्यामुळे धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण दिले तर हा आदिवासी समाजावर मोठा आन्याय होणार आहे त्यामुळे धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात येवू नये अन्यथा एकलव्य जनता दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे हे निवेदन देताना मोठ्या संख्येने आदिवासी समाज कार्यकर्ते उपस्थित होते