राजकिय
आजी-माजी आमदारांना अमरसिंह पंडित यांच्या कडुन धोबीपछाड

आजी-माजी आमदारांना अमरसिंह पंडित यांच्या कडुन धोबीपछाड
९० टक्के पेक्षा जास्त मते घेवुन राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा गेवराईत विजय
अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त मते घेवुन विजयी झाले आहेत. आजी-माजी आमदार एकत्र येवुनही त्यांना या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. अमरसिंह पंडित यांनी आजी-माजी आमदारांना या निवडणुकीत धोबीपछाड देवुन बाजार समिती वरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणुक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळन करत विजयी जल्लोष साजरा केला.