फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा पित्याची पोलिस अधिक्षक यांचेकडे मागणी.

फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा पित्याची पोलिस अधिक्षक यांचेकडे मागणी.
एक महिन्याचा कालावधी उलटूनही अल्यवयीन मुलीचा तपास लावण्यात आला नसून, या घटनेचा लवकरात लवकर तपास लावावा व माझी मुलगी स्नेहल हिचा शोध लावून आरोपीस अटक करुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी टाकळीभान येथील अशोक लालचंद कचे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक अहमदनगर यांचेे कडे निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात नमुद केले आहे की, मी टाकळीभान, तालूका. श्रीरामपुर, जि. अहमदनगर येथील रहिवासी असून दिनांक ०३/०७/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मी आमच्या शेळ्या चारण्यासाठी भोकर शिवारात गेलो होतो. तसेच आमचे गावाचा बाजार असल्याने पत्नी दुपारच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मुलगी स्नेहल ही घरी एकटी होती. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मी शेळ्या घेऊन व पत्नी बाजार घेऊन घरी आलो असता त्यावेळी मुलगी स्नेहल ही घरात दिसली नाही. त्यानंतर बराच वेळ झाला तरी मुलगी स्नेहल घरी न आल्याने आम्ही तिचा घराचे परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचेतरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी फुस लावून माझे घरून पळवून नेले आहे. तशी फिर्याद मी श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनला दि. ०३/०७/२०२३ रोजी गुन्हा रजि. नं. ३४३ / २०२३ प्रमाणे दिली आहे.
घटना घडून एक महिन्याचा कालावधी उलटूनही
पोलिसांकडून अद्याप पर्यंत मुलीचा व तीला फुस लावून पळवून नेणार्याचा तपास लागला नाही.
माझी मुलगी स्नेहल ही इयत्ता १२ वी मध्ये शिकत होती व तिचे वय १७ वर्षे असून ती अल्पवयीन आहे त्यामुळे तिला चांगले बरेवाईट कळत नाही त्यामुळे या घटनेचा तपास तातडीने लावावा म्हणून मी
श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनला वेळोवेळी जाऊन मुलीच्या शोधाबाबत विचारले असता समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तसेच माझे घरासमोरील राहणारे बाबासाहेब भवार यांचा भाचा साईनाथ नानासाहेब निर्मळ हा देखील त्या घटनेपासून गायब आहे त्या संदर्भाने पोलिसांना देखील मी वेळोवेळी माहिती दिलेली आहे. माझी मुलगी स्नेहल हिचे जिवाचे काही बरेवाईट केले असल्याबाबत मला त्यांचेवर संशय आहे. तरी तातडीने मुलीचा तपास लावावा असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,
उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई,
रुपालीताई चाकणकर, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देण्यात आल्या आहेत.
मुलीचा शोध लावावा म्हणून पित्याची पालक
मंत्र्यांकडे धाव.
——————————————————————
माझ्या अल्यवयीन मुलीस फुस लावून पळवून नेलेले असून या घटनेला एक महिना झाला आहे तरी अद्याप पर्यंत पोलिसांनी मुलीचा शोध लावला नसल्याने माझ्या मुलीचा शोध लावावा अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अशोक कचे यांनी केली आहे.