पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा
गेवराईत व्हॉईस ऑफ मीडियाची निवेदनाद्वारे मागणी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करुन त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी गेवराई तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विनोद नरसाळे, गेवराई तालुकाध्यक्ष विनोद पौळ, जेष्ठ पत्रकार सुनील मुंडे, कार्याध्यक्ष राजेश राजगुरु, विष्णू गायकवाड, वैजिनाथ जाधव, कालिदास काकडे, विनायक उबाळे, त्रिंबक कोकाट, तुकाराम धस, कामराज चाळक, गोपाल चव्हाण, अतीखभाई शेख, आर.आर.बहिर, अजहर इनामदार, सचिन डोंगरे, आसेफ शेख, यासीन शेख यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार संदीप महाजन हे दि.१० ऑगस्ट रोजी आपल्या दुचाकीवरुन जात असताना काही हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. पत्रकारावरील हा हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ल्ला असून ही मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने या हल्ल्याचा जाहिर निषेध करण्यात येत असून हल्लेखोरांना पत्रकार संरक्षण काद्यान्ववये कडक शासन करावे, जेणे करुन पुन्हा पत्रकारांवर असे हल्ले होणार नाहीत, अशी मागणी यावेळी गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.