गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,सह सुप्रीमकोर्टचे न्यायाधीश चंद्रचूड शनिदरबरी*

*गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,सह सुप्रीमकोर्टचे न्यायाधीश चंद्रचूड शनिदरबरी*
शनीशिंगणापूर–गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काल( २६ रोजी) शनिवारी १२ वाजल्याच्या दरम्यान शनिशिंगणापूरला येऊन शनिदेवाची विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.तसेच नवी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे सकाळी साडेआठच्या सुमारास मोटारीच्या ताफ्यात शनिशिंगणापूरात दाखल होऊन विधिवत पूजा करून शनिदेवाचे दर्शन घेतले.त्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड हे शिर्डीकडे रवाना झाले.न्यायमूर्ती चद्रचुड यांचे जन्म ठिकाण नेवासा येथे झाला आहे. त्याचे जन्म भूमी नेवासाच आहे मी आता कायमच दर्शनाला येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त पोपटराव शेटे आदी उपस्थित होते
या प्रसंगी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे ,डी. वाय. एस.पी.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर चे स.पो.नि.रामचंद्र कर्पे, सोनईचे स.पो.नि.सचिन बागुल यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,प्रा.शिवाजी दरदले,बाळासाहेब बोरुडे,सरचिटणीस आप्पासाहेब शेटे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सुप्रीम चे न्यायमूर्ती डॉ. चंद्रचूड यांचे स्वागत केले.मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शनिशिंगणापूर परिसरात विकसित कामाची पाहणी करून प्रशंसा केली.
शनिशिंगणापूरात दिवसेंदिवस भाविकांची मोठी गर्दी होत आहे.