धार्मिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने ,बालदिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा ,

टाकळीभान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने ,बालदिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा ,
टाकळीभान येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विठुरायाच्या नामघोषात बालदिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला आषाढी एकादशी असल्याने संपुर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तीमय तयार झाले आहे शाळेच्या वतीने ग्रामदिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये दोनशे ते तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते गळयात वीणा हातात टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकत शिस्तबद्ध दिंडी काढण्यात आली , ज्ञानोबा माउलींचा गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती पताका घेतलेले चिमुकले वारकरी भक्तीमय वातावरण विदयार्थ्यानी वारकऱ्यांचा पेहराव केला होता “जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी ज्ञानोबा माउली तुकाराम अशा जय घोषांनी टाकळीभान परिसर दुमदुमुन गेला होता , यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू शिक्षक कानडे सर ,पठारे सर ,शिक्षिका तसेच परिसरातील ग्रामस्थ दिंडीत सहभागी झाले होते