अमानुष अत्याचाराचा खेड कोर्टातील कामकाजावर परिणाम,वकिल संघटनेत ही संतापाची भावना
आळंदीतील अमानुष अत्याचाराचा खेड कोर्टातील कामकाजावर परिणाम,वकिल संघटनेत ही संतापाची भावना
आळंदी येथे खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेमुळे तीव्र पडसद उमटत आहेत. अशा घाणेरड्या प्रकाराबाबत तीव्रनापसंती आणि संताप वकील बांधवांमध्ये होता.त्याचाच परिणाम म्हणून खेड वकील बार असोसिएशन मधील वकील बांधवांनी केलेल्या निषेधाचा ठराव कारणी लागला आहे.दिनांक 6/1/2025 रोजी आरोपी महेश नामदेव मिसाळ रा. खोकर मोहा, ता. शिरूर कासार, जि.बीड.या नराधमास आळंदी पोलीस स्टेशन कडून पोलीस कर्मचाऱ्यामार्फत खेड अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश मा एस. बी. पोळ साहेब, यांच्या कोर्टात हजर केले गेले होतें. मात्र खेड वकील बार असोसिएशन अध्यक्ष व कार्यकारणी यांनी केलेल्या निषेध ठरावानुसार आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेण्यास पुढे आले नाही.याचा सरळ परिणाम कोर्टाच्या कामकाजावर झाला.सुमारे बराच काळ वकीलपत्र घ्यावं म्हणून शोधाशोध सुरू होती. परंतु संतप्त असलेल्या वकिलांकडून या नराधमाचे वकीलपत्र घेण्यास नकार देण्यात आला. या तालुक्याला तीर्थक्षेत्र आळंदीच्या पवित्र भूमीची पार्श्वभूमी असे असताना असे प्रकार सर्रास घडतात याबद्दल नाराजी असल्याचेही खेड तालुका बार असोसिएशन अध्यक्ष रोहिदास टाकळकर यांनी सांगितले.सायंकाळी सहा वाजले तरीही कोणीही वकील आरोपीचे वकीलपत्र घेत नव्हते. शेवटी मेहरबान कोर्टाने त्याबाबत वकीलपत्र घेऊन कामकाज सुरू करावे यासाठी अध्यक्ष खेड वकील बार असोसिएशन आणि कार्यकारिणी यांना विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष ॲड,रोहिदास टाकळकर यांनी विचारणा केल्यानंतर दिली आहे. आज कोर्टामध्ये सुमारे 250 वकील हजर होते परंतु आळंदीतील दुर्दैवी आणि पुण्यभूमीला काळीमा फासणाऱ्या घटने च्या निषेधार्थ तीव्र संताप वकिलांच्या संघटनेमध्ये होता. त्यामुळे मेहरबान कोर्टाने विनंती करून ही कोणीही वकीलपत्र घेतले नाही.कोर्टाचे कामकाज उशिरापर्यंत त्यामुळे चालू ठेवावे लागले.दरम्यान आरोपीला पाठीशी घालणाऱ्या महिला साथीदारा विरोधात तपास कामासाठी आरोपीस मे. कोर्टाने दि.9/1/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे.