महाराष्ट्र
पंकजा मुंडे यांनी अनाथ व निराधार बालकांसमवेत साजरा केला जागतिक योग दिन

पंकजा मुंडे यांनी अनाथ व निराधार बालकांसमवेत साजरा केला जागतिक योग दिन
छ.संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर येथे बालोन्नती फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बालगृहातील अनाथ व निराधार बालकांसमवेत जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी भाजपच्या राष्ट्रीय सचिव मा.पंकजा ताई मुंडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री मा.अतुल सावे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष बोराळकर आदिंची उपस्थित होती.दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मार्गदर्शन केले.