दिल्ली राजपथ भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त निवड झालेल्या मेजर विजय शेंडे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार….

दिल्ली राजपथ भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त निवड झालेल्या मेजर विजय शेंडे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार….
दिल्ली राजपथ भवन येथे झालेल्या 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलेट बायकर परेडमध्ये निवड होऊन यशस्वी पथसंचलन केल्याबद्दल व टाकळीभान ची मान गौरवाने उंच विल्याबद्दल गावातील भूमिपुत्र मेजर विजय शेंडे यांचा टाकळीभान शिवसेना भवन येथे शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रराज्यातून एकमेव बुलेट बाईककर परेडसाठी त्यांची निवड झाली होती यासंदर्भात 2017 पासून बुलेट बायकर ट्रेनिंग त्यांना सुरू होती. अतिशय खडतर व कसरतीची ट्रेनिंग त्यांनी पूर्ण करून, दिल्ली राजपथ भवन येथे देशाचे गृहमंत्री मंत्री, पंतप्रधान ,राष्ट्रपती ,सर्वच खात्याचे मंत्री व विविध महत्वाच्या खात्याचे अधिकारी, मोठ्या प्रमाणावर नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहत असतात तसेच संपूर्ण जगाचे लक्ष या कार्यक्रमांकडे असते तसेच देशाच्या सामर्थ्याचे व अभिमानाचे प्रतीक ही परेड असल्याने मेजर विजय शेंडे यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली व आपल्या देशाची, राज्याची व गावाची मान उंचावली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन कौतुक होत असून विविध ठिकाणी सत्कार होत आहेत. त्यांच्या टाकळीभान येथील सत्कार प्रसंगी, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, विजय कोकणे, संदीपराव कापसे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ, ग्रा. सदस्य मोहन रणनवरे, विष्णुपंत पटारे,शंकर ताठे, भैय्या कोकणे, गणेश जेजुरकर, बाळासाहेब दुधाळे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले