बेलापुरात समता परिषद, सावता मंडळाच्या वतीने महात्मा दिन साजरा

बेलापुरात समता परिषद, सावता मंडळाच्या वतीने महात्मा दिन साजरा
थोर समाजसुधारक ज्योतीराव फुले यांना महात्मा ही पदवी देवुन गौरविण्यात आले होते त्या घटनेस आज १३५ वर्ष पुर्ण होत आहे त्या निमित्ताने समता परिषद, सावता महाराज मंडळ व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले . ११ मे १८८८ या दिवशी रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहाद्दुर विठ्ठल कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते ज्योतीराव फुले यांना मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे तमाम जनतेच्या वतीने महात्मा या पदवीने गौरविण्यात आले होते .या घटनेस १३५ वर्ष पुर्ण होत आहेत त्यामुळे हा दिवस महात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आला या वेळी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले या वेळी विलास मेहेत्रे व प्रकाश कुऱ्हे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी जालींदर कुऱ्हे ,बाजार समितीचे संचालक अभिषेक खंडागळे राजेंद्र सातभाई अर्जुन कुऱ्हे सखाराम टेकाडे पत्रकार देविदास देसाई सुहास शेलार ,संदीप कुऱ्हे प्रभात कुऱ्हे सोमनाथ शिरसाठ प्रफुल्ल कुऱ्हे महेश कुऱ्हे तुकाराम मेहेत्रे जनार्धन ओहोळ वैभव कुऱ्हे सुनिल अनाप उपस्थित होते