बेलापुरच्या मुख्य चौकातील ध्वजस्तंभामुळे गावच्या वैभवात भर

बेलापुरच्या मुख्य चौकातील ध्वजस्तंभामुळे गावच्या वैभवात भर
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त बेलापुर ग्रामपंचायतीने मुख्य ध्वजस्तंभाचे सुशोभिकरण केले असुन राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे पुजन करण्यात आले आहे या ध्वजस्तंभामुळे बेलापुरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे बेलापुरच्या मुख्य चौकातील ध्वजस्तंभाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय बेलापुर ग्रामपंचायतीने घेतला.
त्यानुसार सदरचे काम बेलापूरचे सुपुत्र,सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले ख्यातनाम शिल्पकार श्री.प्रशांत विनायकराव बंगाळ यांच्यावर सोपविले होते या सुशोभिकरणारासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री.शरद नवले यांनी ५ लाख रुपये निधी उपलब्ध केला.श्री.प्रशांत बंगाळ यांनी अत्यंत कल्पकतेने विजय स्तंभाचा आराखडा बनविला.सदर काम संपूर्ण दगडी असून, या कामासाठी बसाल्ट या महाराष्ट्राच्या अग्निजन्य स्थानिक दगडाचा वापर केला आहे.
सदर दगड वेरुळ-अजिंठा या जगप्रसिध्द लेण्यांमध्ये आढळतो. या कलाकृतीच्या मध्यभागी नविन ध्वजस्तंभ बसविण्यात आला आहे.त्याभोवती अष्टकोनी चबुत-याचे बांधकाम करण्यात आले.अष्टकोन हे चांगले आरोग्य व भविष्याचे प्रतिक मानले जाते.त्यावर कमळाचे नक्षीकाम आहे.कमळ हे शुध्दतेचे व पाविञ्याचे प्रतिक आहे.कमळ चिखलातून उगवते यातून आपल्याला लढवैय्या वृत्ती शिकण्यास मिळते.तसेच यात फुलांचेही नक्षीकाम आहे.फुल हे आनंद व शांततेचे प्रतिक आहे. या अष्टकोनी चौथ-यास दिवे बसविण्यात आलेले आहेत.दिवा हे प्रकाशाचे तसेच नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतिक आहे.
यात चार दिशांना चार हत्ती आहेत.जे शक्ती व ऐश्वर्याचे प्रतिक असून चारही दिशांनी येणाऱ्या नागरीकांचे स्वागत करतात.असा भास निर्माण होतो अशा त-हेने अत्यंत कल्पकतेने विविध प्रतिकांचा वापर विजय स्तंभासाठी करण्यात आला आहे.सदरचे काम अल्पावधीतच पूर्ण करण्यात आले आहे .हा विजय स्तंभ गावाच्या प्रवेश चौकाची शोभा वाढविणारा ठरणार आहे.तसेच सदरचा आकर्षक विजय स्तंभ गावासाठी भुषणावह ठरणार आहे.
स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवी व बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षाचे औचित्य साधुन मा जि प सदस्य शदर नवले यांच्या भरीव अशा आर्थिक योगदानातून सदरचे सुशोभिकरण होत असुन याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी दिली असुन बेलापुरचे नागरीक व ख्यातनाम शिल्पकार प्रशांत बंगाळ यांनी अतिशय कमी खर्चात कमी वेळात हे काम पुर्ण करुन दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले आहे.