कृषीवार्ता

शेतकऱ्यांनी शेतीसोबत उद्योग व्यवसाय करुन आर्थिक सुबत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत- वसुदेव सोळंके

शेतकऱ्यांनी शेतीसोबत उद्योग व्यवसाय करुन आर्थिक सुबत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत- वसुदेव सोळंके

महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 

शेतकऱ्यांनी ग्रुप पध्दतीने शेती करुन आपला आर्थिक विकास साधून शेती करताना नवीन तंत्रज्ञान शिकणे आवश्यक आहे. शेतीसोबत उद्योगाची साथ असेल तर वातावरणातील अनियमिततेचा विपरीत परिणाम आर्थिक परिस्थितीवर होणार नाही. तसेच शेतीसोबत छोटा मोठा उद्योग व्यवसाय करुन आपल्या आर्थिक सुबत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी व्यक्त केले. 

       

बीड येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या क्षेत्रीय कार्यालयात २०२३-२४ या वषार्चे शंभर टक्के पीककर्ज नूतनीकरणाच्या कामाला वेग यावा त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन्मान बळीराजाचा,वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत पीक कर्ज नियमितपणे परतफेड करुन नुतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांचा बळीराजा सन्मान सोहळ्याने गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, उपनिबंधक गोपाळकृष्ण परदेशी, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे संभाजीनगर नियोजन विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक संतोष प्रभावती, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे बीडचे क्षेत्रीय व्यवस्थापक आर.बी. कुरमुडा यांच्या सह आदी उपस्थित होते. 

 

या वेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी अधिक्षक जेजूरकर यांनीही 

 

शेतकऱ्यांसाठी आपले अनमोल विचार व्यक्त करुन बॅंकेची शेतकऱ्यांच्या विकासातील कटीबद्धता स्पष्ट केली. दरम्यान यावेळी शेतकरी बांधवांना प्रशस्तीपत्र, बागायतदार रुमाल, पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील साडेपाचशे शेतकरी बांधवांनी आपला सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव भराटे, निलिमा बोटूवार, स्वाती चारभे, उमेश वाघ यांच्या सह बीड जिल्ह्यातील सर्व शाखांचे शाखा व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.तर याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन निलिमा बोटूवार यांनी तर उपस्थित शेतकऱ्यांना नियमीतपणे पीककर्ज परतफेडीचे महत्त्व विषद करुन क्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र कुरमुडा यांनी आभार व्यक्त केले.

 

शेतकऱ्यांनी नियमीतपणे पीककर्ज भरुन बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा – क्षेत्रीय व्यवस्थापक कुरमुडा*

 

शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून घेतलेल्या पीककर्जाच्या रक्कमेतून समुह तसेच शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती करुन शेतीत नवनवीन प्रयोग राबवून आपल्या आर्थिक सुबत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत तसेच नियमीतपणे पीककर्जाची परतफेड करुन बिनव्याजी पीककर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र कुरमुडा, क्षेत्रीय शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बीड यांनी केले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे