टाकळीभान येथे बुलेट मोटारसायकलची चोरी.

टाकळीभान येथे बुलेट मोटारसायकलची चोरी.
टाकळीभान येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ. निलेश कांबळे यांची बुलेट क्रमांक एम एच १७ बी आर ५६५५ हॉस्पिटल समोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
काल दिनांक ५ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी हाॅस्पिटलसमोर उभी असलेली बुलेट दुचाकी लाॅक तोडून चोरून नेली आहे. बुलेट चोरीचे हे दृश्य सी सी टि व्ही कॅमेर्यात कैद झालेले आहे. या दृष्यात दोन चोरटे हाॅस्पिटल जवळ येवून बुलेटचे लाॅक तोडून दुचाकी घेवून जात असल्याचे दिसून येत आहे.
यापुर्वीही टाकळीभानसह परिसरातून अनेक दुचाकींच्या चोर्या झालेल्या असून काल झालेल्या बुलेटच्या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून पोलासांनी सी सी टी व्ही कॅमेर्यात कैद झालेल्या चोरट्यांचा तपास लावून चोरट्यांना पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या बाबत डाॅ. निलेश कांबळे यांनी बुलेट चोरीची तक्रार श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.