मतदार केंद्र दगड फेक या दगड फेकीत वरीष्ठ अधिकारी सहीत तीन पोलीस कर्मचारी जखमी*

*केकतपांगरी मतदार केंद्रातील हरीलाल तांडा केंद्रावर दगड फेक या दगड फेकीत वरीष्ठ अधिकारी सहीत तीन पोलीस कर्मचारी जखमी*
निवडणूक अधिकाऱ्यांचा गलथान कारभार वारंवार मतदान यंत्र बंद पडत असल्यामुळे लोकांना राग अनावर झाला नाही त्या कारणाने धक्काबुक्की झाली व याचे रूपांतर दगडफेकीत झाले.
या दगड फेकीत वरीष्ठ अधिकारी सहीत तीन पोलीस कर्मचारी जखमी.
वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कर्मचारी च्या डोक्याला व पायाला मार लागला आहे.
महिलानां पुढे करून हा हल्ला करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी च्या अंगावर महिला धावून आल्या.
जखमी पोलीस कर्मचारी वर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
एका कर्मचारी ला पायाला फ्याक्चर असल्याने बीड जिल्हारुग्णालत रेफर करण्यात आले.
वरिष्ठ अधिकारी डीवायएसपी स्वप्निल राठोड ,पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार ,ए एस आय गलधर,पोलीस चालक कुडके सह दहा ते बारा कर्मचारी जखमी.
गेवराई तालुक्यातील केकतपागंरी हरीलालतांडा याठिकाणी मतदान मशीन काही काळ बंद पडली होती प्रशासनाने ती पुन्हा सुरू केली परंतू याठिकाणी कर्तव्यावर असनाऱ्या पोलिस कर्मचारी यांच्यावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती असुन उपविभागीय अधिकारी कार्यलयातील बंदोबंस्थावर असनारे एएस आय गलधर यांना दगडफेकीत गंभीर ईजा झाली असल्याची माहिती आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील ७६ ग्रामपंचायती साठी आज दि १८ रोजी मतदान प्रक्रीया पार पडली प्रशासनाच्या वतिने चोख पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता परंतू पागंरी तांडयावरील बूध केंद्रात वारवार मतदानसाठी वापरण्यात येणारी मशीन बंद पडत होती अतापर्यंत याठिकाणी मतदान सुरू आहे आठ वाजण्याच्या सुमारास २९४ मतदान याठिकाणी आहे प्रशासनावर नाराजी व्यक्त करत वारवार मशीन बंद पडल्याने याठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यात विलंब होत आहे यामुळे याठिकाणच्या महिला व ग्रामस्थं यांनी बंदोबस्तावर असनाऱ्या पोलिसांवर दगडफेक केली आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलयातील ए एस आय गलधर हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच पांगरी याठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त रवाना करण्यात आला असुन वरिष्ठ उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड हे घटना स्तळावर दाखल झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे .