पोलिसांकडून अट्टल गुन्हेगाराना अटक; मोटर सायकल चोरीचे पाच गुन्हे उघड*

*आळंदी पोलिसांकडून अट्टल गुन्हेगाराना अटक; मोटर सायकल चोरीचे पाच गुन्हे उघड*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी दि 3, माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना करून घरफोडी, चोरी, वाहन चोरी, याबाबत विशेष तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनचे गुन्हे तपास पोलीस हवालदार लोणकर,पोलीस कॉन्स्टेबल खेडकर,हे आळंदी एमआयडीसी सोळू परिसर भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना, सोळव परिसरातील रॉयल हॉटेल समोर आळंदी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 351 // 2022 भा.दं. सं.379 गुन्ह्यातील मोटर सायकल एम एच 14 सी एन 95 11 पल्सर 180 वरून इसम नासिर शमशुद्दीन शेख वय वर्षे 36 रा.सोळव ,ता. खेड ,जि. पुणे ,मूळ राहणार इकबाल कॉलनी ,कंदील चौक, कर्नाटक, गुलबर्गा ,या इसमास हटकले असता , संबंधित वाहना बाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून आळंदी पोलीस स्टेशन येथे त्यास अटक करून आणण्यात आले,
अटक असताना तपास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास घेतला असता सुमारे पाच गुन्ह्यांमध्ये त्यांने कबुली दिली आहे, गुन्हेगाराकडून सुमारे दोन लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये ऐकून 8 मोटरसायकली ,भा. दं.सं. 379 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नोंद असलेले दिघी पोलीस स्टेशन व आळंदी पोलीस स्टेशन अशा मिळून आलेल्या आहेत,
सदर तपास करत असताना आळंदी पोलीस हवालदार लोणकर, पोलीस कॉन्स्टेबल खेडकर, यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त विवेक पाटील सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशन सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक गुन्हे रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जोंधळे, पोलीस नाईक सानप, हवालदार साळुंखे ,आळंदी पोलीस टीम यांनी सुमारे वरील पाच गुन्हे उघडकिस आणले असून,8 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत
त्यापैकी तीन मोटरसायकल मालकांचा शोध घेणे चालू आहे,पुढील काळामध्ये पेट्रोलिंग जास्त करून गुन्हेगारास जरब बसवण्याचं कार्य आळंदी पोलीस स्टेशन मार्फत केले जाईल, अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक गुन्हे रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जोंधळे, यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे,पोलिसांच्या या कामगिरी बाबत आणि अट्टल गुन्हेगाराला पकडल्याबाबत आळंदी परिसरातून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे,