महाराष्ट्र
टाकळीभान घुमनदेव रोडला पडले खड्डे… रस्त्याची दुर्दशा लोकप्रतिनिंनी लक्ष घालण्याची गरज…

टाकळीभान घुमनदेव रोडला पडले खड्डे… रस्त्याची दुर्दशा लोकप्रतिनिंनी लक्ष घालण्याची गरज…
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान घूमनदेव रस्त्याला खड्डे पडले असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा रस्ता औरंगाबाद जिल्ह्याला जोडणारा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्याला असते या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत असून यामुळे वाहनदारांना त्रास होत असून त्वरित रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, संजय पटारे, दामोदर शिंदे, दिलीप पटारे, संदीप पटारे, सुजित बोडखे, बद्रीनाथ पटारे, अनिल पटारे, मच्छिंद्र पटारे, सुनील पटारे, सुरेश पटारे आदींनी केली आहे.