घोगरगाव येथे लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

घोगरगाव येथे लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
टाकळीभान प्रतिनिधी –नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरती करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी दिलीप लोखंडे यांनी तरुणांनी फक्त नोकरी मागे न लागता उद्योग व्यवसाय कडे वळले पाहिजे असे सांगितले तसेच मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ लोहार बांधवांनी घ्यावा असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, जयंतीला मोठा प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता,
यावेळी वसंतराव लोखंडे, मनसूक लोखंडे, अशोक लोखंडे ,रमेश लोखंडे, सुभाष लोखंडे,सुदाम लोखंडे ,गोरक्षनाथ लोखंडे ,गणेश लोखंडे, सचिन लोखंडे, अमोल लोखंडे, प्रवीण लोखंडे, गोपाळ कळसे,विशाल लोखंडे राजेंद्र लोखंडे, किरण लोखंडे, सागर लोखंडे, योगेश लोखंडे , मयूर लोखंडे,संतोष लोखंडे, सचिन पवार, नवनाथ लोखंडे ,महेश लोखंडे , गोरख सावंत व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.