धार्मिक
टाकळीभान येथे होळी सण उत्साहात साजरा..

टाकळीभान येथे होळी सण उत्साहात साजरा..
टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे सालाबाद प्रमाणे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिरा शेजारी दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थांनी गौरी व नैवेद्य दिले व होळीची पूजा करून होळी सण साजरा केला. होळीची पूजा विशाल पटारे, अतिश नाटकर, कोतवाल सदाशिव रणनवरे यांच्या हस्ते संपन्न झाली. होळी सण शांततेत साजरा व्हावा म्हणून या प्रसंगी श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक जिवन देनिवाल, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,यांनी धावती भेट दिली ,टाकळीभान दूरुक्षेत्रचे पो.हे.त्रिभुवन, बाबर, कराळे व बाबा सय्यद आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .