वीज पुरवठा खंडित केल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या …….

वीज पुरवठा खंडित केल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या …….
जिल्ह्यातील नगर तालुक्यातील मौजे अमळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांना महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता व ५६ /१ ची नोटीस न देता बेकायदेशीर वीजपुरवठा खंडित केला त्यास आठ दिवस झाले. शेतात उभी पिके जळत असताना पाहून शेतकऱ्याने पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना ही दुर्दैवी असून सरकारच्या व सरकारी धोरणा मुळे झाली आहे .यापूर्वीही महाआघाडी सरकारच्या काळात पंढरपूर येथे ही वीज तोडली म्हणून दुर्दैवी शेतकरी आत्महत्या झाली .
सरकार कुठलेही असो वीज, बँकेचे कर्ज, पिकाला भाव न मिळाल्यामुळे दुर्दैवी आत्महत्या होत आहे . सत्तेत येण्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री हे महा आघाडी सरकारला विज बिल माफ करावे म्हणून मागणी करत होते.आणि आज सत्तेत येताच ,शेतकऱ्यांची वीज तोडत आहे .राज्यातील सर्व पक्षांचे आमदार खासदार हे शेतकरी प्रश्नावर राजकारण करत असून फक्त सत्ता उपभोवण्याचं काम करत आहे .शेतकरी संघटनेने या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस, अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक, अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता या सर्वांना या घडलेल्या दुर्दैवी आत्महत्येस जबाबदार धरून सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगरचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अधिकारी यांना केली आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीय व अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने घेतली आहे .या घटनेप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नाना नांदखेडे ,पश्चिम विभाग प्रमुख शेतकरी संघटना पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, जिल्हा युवा आघाडीचे बच्चू मोडवे, आदीं
कार्यकर्त्यांसह अकोळनेर गावातील तीन चारशे ग्रामस्थ उपस्थित होते. तरी शासनाने दुर्दैवी घटनेतून बोध घेऊन शेतकऱ्यांची येथून पुढे थकबाकी साठी वीज तोडणी बंद करावी व दुर्दैवाने होत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबवाव्या अन्यथा शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करतील . याची सर्व जबाबदारी संबंधित शासनातील विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांचे वर राहील असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे