तिळापुर दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे काम पूर्णत्वाकडे
गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. काम पूर्णत्वाकडे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे काम पूर्णत्वाकडे
राहुरी तालुक्यातील तिळापुर व पंचक्रोशी मध्ये तिळापूर चे आराध्य दैवत तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले तिळापूर मधील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे काम पूर्णत्वाकडे. नागरिकांनी लोकवर्गणीतून कुठलीही अपेक्षा न करता तिळापूर ग्रामस्थांनी व परिसरातील भाविक भक्तांनी स्वइच्छेने वर्गणी देऊ दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे काम मोठ्या पद्धतीने तयार करण्यात आले गावेला साजेशी भव्यदिव्य मंदिराची वास्तू तयार झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. देवगड मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या हस्ते कामाला सुरुवात झाली अतिशय वेगाने व भव्य दिव्य असे दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे न थांबता काम पूर्णत्वाकडे गेल्याने राहिलेले काम लवकरच पूर्ण करण्याचा ग्रामस्थांचा निश्चय असून तरी नागरिकांनी राहिलेली देणगी तात्काळ कमिटीकडे सुपूर्त करावी व गावांमध्ये तयार झालेल्या वास्तुमध्ये आपली फूल ना फुलाची पाकळी कामाला आलेली आहे याचे समाधान निश्चितच राहील असे प्रतिपादन भास्करगिरी जी महाराज यांनी केले. मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून कळसाचे बहुत काम लवकरच पूर्ण होणार असून राहिलेल्या वर्गणीदार यांनी आपली वर्गणी त्वरित मंदिर कमिटीकडे सुपूर्त करावी असे तिळापुर वासियांना तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे देणगीसाठी संपर्क
करावा