महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रवादी संमता सप्ताह साजरा करण्यात येत आहे तरी या सप्ताहाची सुरुवात श्रीगोंदा सिध्दार्थनगर आंबेडकर भवन येथून करण्यात आली..या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप,कार्याध्यक्ष गोरख घोडके व सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी यांनी केले..तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले तसेच भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे देखील पूजन करण्यात आले.. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष मा घनश्याम आण्णा शेलार होते तसेच या कार्यक्रमात जिल्हापरिषदेचे मा अध्यक्ष बाबासाहेब भोस,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,उपस्थित होते..तरी दोन वर्षे कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झालेली नव्हती त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा ना जयंत पाटील यांच्या संकल्पनेतुन प्रत्येक गाव वाड्या वस्त्या येथे जाऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करून संविधानाचे महत्व पटवून देण्यात यावे असे सांगण्यात आले त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या सरकारने गेली दोन वर्षे मागासवर्गीय समाजासाठी जे शासन निर्णय घेतले गेले तसेच ज्या योजना समाजाच्या हितासाठी घोषित केल्या ते सर्व शासन निर्णय लोकांना समजावून माहिती देण्यात आली..तसेच संविधानाचे महत्व सांगण्यात आले,केंद्र सरकार कशा पद्धतीने संविधानाची पायमल्ली करून दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत याबद्दल समाजात प्रबोधन करण्यात आले..यावेळी मुकुंद सोनटक्के,भगवान गोरखे,उपनगराध्यक्ष संग्राम घोडके,नगरसेवक प्रशांत गोरे,नगरसेवक निसार बेपारी,नगरसेवक हृदय घोडके,नगरसेवक समीर बोरा,मोहन भिंताडे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे,कार्तिक घोडके,प्रफुल्ल अडागळे, रतन ससाणे,शिवा घोडके,रमण सोनवणे,तृषाल ससाणे,भूषण घाडगे,सुभाष ससाणे,भाऊसाहेब घोडके,जेष्ठ कार्यकर्ते दादाराम घोडके,आदी सिद्धार्थ नगर व ससाणेनगर येथील जेष्ठ युवक नेते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच सूत्रसंचालन गोरख घोडके यांनी केले व संग्राम घोडके यांनी आभार व्यक्त केले.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.