स्वतंत्र फिडर मजूर करणार–मंत्री तनपुरे

स्वतंत्र फिडर मजूर करणार–मंत्री तनपुरे
ना.बनसोडे व ना.तनपुरे शनीचरणी
सोनई–राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजय बनसोडे व ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी काल दि.१६ रोजी शनिशिंगणापूर येथे शनिचौथर्यावर जाऊन तेल अर्पण करून शनिदर्शन घेतले.
साईबाबांचे दर्शन घेऊन दुपारी शनिशिंगणापूरात दाखल झाले होते.
ना.बनसोडे व ना.तनपुरे यांना येथील विजेच्या समस्या निदर्शनास आणून विजेबाबद गावठाणकरीता स्वतंत्र फिडरची मागणी ऍड.सायराम बानकर यांनी केली. त्यावर मंत्री मोहोदयानी जलसंधारणमंत्री ना.शंकरराव गडाख यांची शिफारस आणून पुढील आठवड्यात लवकरच अधिकाऱ्याची बैठक बोलवून भारनियमन ची समस्या दूर करण्याचे आश्वासन ऍड.बानकर यांना दिले.
यावेळी जनसंपर्क कार्यलयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर यांनी मंत्री मोहोदयाचा सन्मान केला.या प्रसंगी उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे,युवा कार्यकर्ते सुभाष पवार,उपस्थित होते.