पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धेचा मान टाकळीभानला… डॉ. रवींद्र कुटे

पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धेचा मान टाकळीभानला… डॉ. रवींद्र कुटे
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान गाव खेळाविषयी जागरूक असून पहिल्यांदाच भव्य खुल्या फुटबॉल स्पर्धेचा मान टाकळीभान गावाने घेतला आहे. असे प्रतिपादन विक्रांत स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य खुल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. रवींद्र कुटे यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच कान्हा खंडागळे, लक्ष्मण कदम गुरुजी, प्रा जयकर मगर, विलास दाभाडे, , डॉ. नितीन मगर, अजित थोरात अजित कदम उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी स्व. गजानन जाधव व स्व. प्रसाद कदम यांच्या पाल्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र कुटे म्हणाले की आरोग्याला लाभदायक असणाऱ्या मैदानी खेळांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्पर्धेसाठी सहकार्य केले असून टाकळीभानचे व माझे क्रीडा व शैक्षणिक क्षेत्राशी नाते जुने असून ते जपले आहे. यावेळेस माजी क्रीडा शिक्षक जयकर मगर यांनी आपण कॉलेजला असताना पहिली फुटबॉल टीम चे प्रतिनिधित्व केल्याची आठवण करून दिली. भारत भवार यांनी सांगितले की खेळामुळे तरुणांचे मन, बुद्धी व मनगट या सर्वांचा विकास होऊन खेळामुळे प्रचंड ऊर्जेचा स्रोत तरुणांमध्ये तयार होतो. त्यामुळे खेळाला जीवनामध्ये विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. या स्पर्धेसाठी सर्व ग्रामस्थ, बक्षीस रुपी योगदान देणारे देणगीदार, व सर्व सहकार्य करणारे मान्यवर, आयोजक यांचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक विशाल गड्डेवाड यांनी केले. या भव्य खुल्या फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. रवींद्र कुटे प्रथम २१०००, उपसरपंच कान्हा खंडागळे द्वितीय ११०००, अल्ताफ मेजर शेख तृतीय ७०००, राहुल पटारे ५००१, अशी भरीव बक्षिसे असून स्पर्धा यशस्वीतेसाठी सागर पटारे, प्रशांत कोकणे, हेमंत पटारे, प्रणव अमोलिक, विपुल मगर, चेतन कुमावत, सार्थक निकाळजे, राहुल रणनवरे,ऋषिकेश गाढे, अभिजीत गाढे, शुभम गाडेकर, तेजस राक्षे, आकाश पवार, दर्शन रसाळ आदींसह विक्रांत स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य, क्रीडाप्रेमी आदी परिश्रम घेत आहेत.