अखेर भोकर येथील तरुणाच्या खुनाची दिली कबुली, परंतु मृतदेह मिळून न आल्याने पोलिसांपुढे मोठे अवाहन.

अखेर भोकर येथील तरुणाच्या खुनाची दिली कबुली, परंतु मृतदेह मिळून न आल्याने पोलिसांपुढे मोठे अवाहन.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून केल्याची कबुली अटक असलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली. आरोपींनी तरुणाचा खून केल्याची कबुली दिली असली तरी त्या तरुणचा मृतदेह अद्याप मिळून न आल्याने पोलिसांपुढे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
भोकर येथील दिपक बर्डे हा तरुण गेल्या बारा ते तेरा दिवसापासून बेपत्ता आहे. त्याच्या बेपत्ता असल्यामागे घातपात असल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केल्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींना अगोदर सात दिवस पोलीस कोठडी मिळाली. नंतर १३ तारखेपर्यंत पुन्हा न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर आरोपींनी दिपकचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींनी दिपकच्या खून केला असल्याची कबुली दिली असली तरी अद्याप दिपकचा मृतदेह सापडला नसल्याने पोलीसासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.