धार्मिक
टाकळीभान येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची जल्लोषात फेरी

टाकळीभान येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची जल्लोषात फेरी
टाकळीभान: श्रीराम जन्मभूमी येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या श्रीराम अक्षदा मंगल कलश यात्रेची फेरी टाकळीभान येथे काढण्यात आली.यावेळी मोठ्या उत्साहात कलश यात्रेचे नागरिकांनी स्वागत केले. विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून कलश यात्रेस सुरुवात करण्यात येऊन गावातून तसेच स्टॅन्ड परिसर येथून फेरी काढण्यात आली. यावेळी भाविकांनी पवित्र भूमी असलेल्या श्रीराम जन्मभूमी येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे दर्शन घेतले.या कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने तरुण युवक, महिला भगिनी, ग्रामस्थ उपस्थित होते .एकूण 18 गावच्या कलशाचे वितरण याप्रसंगी झाले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी फेरी समाप्तीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.