डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विषमता ,दरी कमी करण्याचे मोठे काम केले… रामचंद्र जाधव…माजी शिक्षण उपसंचालक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विषमता ,दरी कमी करण्याचे मोठे काम केले… रामचंद्र जाधव…माजी शिक्षण उपसंचालक
टाकळीभान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील आर्थिक विषमता स्तर, उच्च-नीच भेदभाव, ही दरी कमी करून समाजामध्ये समानता आणण्याचे मोठे कार्य केले आहे. टाकळीभान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव बोलत होते,
ते म्हणाले की जो समाज मागासलेला, दुर्लक्षित ,वंचित होता अशा समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला, व प्रवाहात आणले, यामुळेच तर माझ्यासारख्या रोजंदारी ने काम करून शिक्षण घेणारा मुलगा शिक्षण उपसंचालक या पदापर्यंत जाता आले, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच कृपा आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महती चे वर्णन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला जगात तोड नसून त्यांच्या संविधानामुळेच आपण आज प्रत्येक जण सन्मानाने जगत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी कार्लस साठे यांनी डॉ,
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष अमलात आणून समाजात जागृती करणे गरजेचे असून खर्चाला फाटा देऊन टाकळीभान सारख्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रास मदत दिली
. यावेळी संदीप जावळे, कु.स्वरा गड्डेवार , कु.संजना अल्लाट यांनी आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे ,पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे,आर पी आय चे उत्तर नगर जिल्हाअध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात,आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आदी महापुरुषांच्या पुष्पहार घालून विधीवत पूजन केली,
कार्यक्रम प्रसंगी संविधान ग्रुप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये. तसेच कोरोना काळा मध्ये जोखीम घेऊन रुग्णांची सेवा करणाऱ्या आशा सेविका यांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच निराधार महिलांना ही साड्या वाटण्यात आल्या. समाजाची सेवा करणारे पत्रकार बांधवांचा ही सन्मान या प्रसंगी करण्यात आला. संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत या ठिकाणी सहा महिने मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्स लेविन शिंगारे यांच्या सहकार्याने ठेवण्यात आला असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आव्हान करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, अशोक चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, अशोक चे संचालक आप्पासाहेब रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राष्ट्रवादी युवक प्रदे उपाध्यक्ष मयूर पटारे अशोकचे माजी उपाध्यक्ष बापूराव त्रिभुवन, ग्राम सदस्य गणेश पवार ,भाजपचे मुकुंद हापसे, नारायण काळे अनिल कांबळे तंटामुक्तीचे आबासाहेब रणनवरे, भैया पठाण, भाऊसाहेब पवार, भाऊसाहेब पटारे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, मेजर प्रशांत रणनवरे, आर पी आय चे युवक अध्यक्ष जॉन रणनवरे, संविधान ग्रुपचे मेजर विनोद रणनवरे, सुंदर रणनवरे, सागर पठाडे,शिवा साठे ,किशोर रणपिसे, शंकरराव पवार, आप्पासाहेब रणनवरे, सतीश रणवरे ,संदीप रणनवरे, विजय आहेर, राजेंद्र रणनवरे, संजय रणनवरे, प्रणव अमोलिक, अनिल कांबळे,शंकर रणनवरे, मधुकर रणनवरे, बाबा रणनवरे, विनोद शिंगारे, अर्जून भालेराव, बबलू बनकर,महेश बोडखे, आनंदा रणनवरे,उमेश त्रिभुवन, मुसा सय्यद,व्हिज्युअल अभ्यास केंद्राचे महेश शिंदे प्रशांत जाधव आदींसह ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.